Leadership Training Workshop : पाच दिवसीय नेतृत्व प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात; मोहाली पंजाब येथे आयोजन

Leadership Training Workshop : गोव्यातील विविध उच्च शिक्षण संस्थांमधील २६ प्राध्यापकांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवला. ही कार्यशाळा पंजाब मोहाली येथील इंडियन स्कूल ऑफ बिझनेसच्या सहकार्याने आयोजित केली होती.
Leadership Training Workshop
Leadership Training Workshop Dainik Gomantak

Leadership Training Workshop :

पर्वरी, उच्च शिक्षण संचालनालय, गोवा उच्च शिक्षण परिषद आणि इंडियन स्कूल ऑफ बिझनेस (आयएसबी) मोहाली-पंजाब येथे ''शासन, नेतृत्व क्षमता आणि परिवर्तन''या विषयावर आधारित पाच दिवसीय नेतृत्व प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार पडली.

गोव्यातील विविध उच्च शिक्षण संस्थांमधील २६ प्राध्यापकांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवला. ही कार्यशाळा पंजाब मोहाली येथील इंडियन स्कूल ऑफ बिझनेसच्या सहकार्याने आयोजित केली होती.

तज्ज्ञ प्राध्यापक, प्रशिक्षक यांनी सादर केलेली सादरीकरणे, प्रात्यक्षिके, विशिष्ट आणि केंद्रभूत विषयांचा अभ्यास यामुळे या कार्यशाळेला बहुआयामी आणि संशोधनात्मक स्वरूप प्राप्त झाल्याची माहिती, या कार्यशाळेचे मुख्य समन्वयक गोवा उच्च शिक्षण परिषदेतील प्रो.डॉ. नियॉन मार्शेन यांनी दिली.

डॉ.आरुषी जैन, (संचालक, आयएसबी), विवेक अत्रे, आयएएस (निवृत्त) अमरजित सिन्हा,आयएएस(निवृत्त),  प्रो.राजेश्वर उपाध्याय, प्रो.अंजल  प्रकाश, प्रो. एस. रामनारायण आदी तज्ज्ञांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले.

शैक्षणिक नेतृत्व प्रशिक्षण कार्यशाळेमुळे राज्यातील अध्यापकांचे नेतृत्व कौशल्य विकसित होऊन शैक्षणिक क्षेत्रात परिवर्तन होणार आहे. हे प्रशिक्षण घेतलेले प्राध्यापक महाविद्यालयातील अन्य घटकांना प्रशिक्षित करतील.

- भूषण सावईकर, संचालक उच्च शिक्षण संचालनालय

कार्यशाळेतील ठळक बाबी

‘प्रेरित नेतृत्व आणि प्रभावी अंतर्गत संवाद’  या विषयावर बोलताना विवेक अत्रे यांनी एकात्मरूपाने काम करण्याचा सल्ला दिला.

‘नेतृत्व का महत्त्वाचे’वर बोलताना अमरजित सिन्हा यांनी उच्च शिक्षण या संकल्पनेवर चर्चा केली.

‘भावनिक बुद्धिमत्ता’वर बोलताना प्रा.राजेश्वर उपाध्याय यांनी  संघर्ष निराकारणाचे महत्त्व स्पष्ट केले.

‘प्राचीन भारतीय ग्रंथातून नेतृत्वपाठ’वर प्रा.अंजल प्रकाश यांनी मार्गदर्शन केले.

नेतृत्व कौशल्याला बळकटी : जैन

नेतृत्व प्रशिक्षण कार्यशाळेतून प्राध्यापकांच्या प्राध्यापकांच्या नेतृत्व कौशल्यांना बळकटी मिळेल, असे आयएसबी संचालक डॉ. आरुषी जैन यांनी केले.

नेतृत्व कौशल्याला गती ः

कार्यशाळेच्या चौथ्या आवृत्तीतून प्राध्यापकांचे नेतृत्व कौशल्य समृद्ध होऊन गती मिळेल. यामुळे गोव्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडून ठळक बदल होतील, असे समन्वयक नियॉन मार्शेन यांनी सांगितले. नेतृत्व ही जबाबदारी आहे, असे प्रा.एस रामनारायण यांनी 'नेतृत्व आणि बदल व्यवस्थापन' वर बोलताना सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com