फोंडा महापालिकेत चार वर्षे संगीत खुर्चीच!

नगरपालिका निवडणूक : नगरसेवक लागले तयारीला; चुरशीची शक्यता
Ponda Municipality News
Ponda Municipality NewsDainik Gomantak

फोंडा : फोंडा नगरपालिका मंडळाचे आता एकच वर्ष राहिले आहे. त्यामुळे नगरसेवकांकडून पालिका कक्षेतील उरलेली कामे पूर्ण करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू झाले आहेत. 20 मे 2018 रोजी विद्यमान नगरपालिका मंडळ अस्तित्वात आले होते. त्यामुळे पुढच्या मे महिन्यात फोंडा नगरपालिकेच्या निवडणुका होणे आवश्यक आहे. (Ponda Municipality News)

येणाऱ्या मे महिन्यात विद्यमान नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. त्यामुळे हे वर्ष आता या मंडळाचे शेवटचे वर्ष ठरणार आहे. जेव्हा हे मंडळ अस्तित्वात आले होते, तेव्हा मगोपप्रणित आघाडीचे 7, भाजप आघाडीचे 5, तर काँग्रेसचे 3 नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळी मगोपचे प्रदीप नाईक हे नगराध्यक्षपदी, तर भाजपचे विश्वनाथ दळवी हे उपनगराध्यक्षपदी विराजमान झाले होते. मात्र, त्यानंतर घडलेल्या घडामोडीत अनेक स्थित्यंतरे झाली. संगीत खुर्चीच्या खेळात 6 नगराध्यक्ष सत्तारुढ झाले.

आता नगरपालिका निवडणुकांकडे नगरसेवकांचे लक्ष लागून राहिले आहे. प्रत्येक नगरसेवकाला आता आपले ‘प्रगतिपुस्तक’ घेऊन मतदारांसमोर जावे लागणार आहे. त्यामुळे सध्या नागरिकांशी संपर्क वाढवण्याची तसेच जमेल तेवढी त्यांची कामे करण्याचे प्रकार शहरात सुरू झाले आहेत. येणारी फोंडा नगरपालिका निवडणूक चुरशीची होणार, याचे संकेत आतापासूनच मिळायला सुरवात झाली आहे.

Ponda Municipality News
'गोव्यात अनुसूचित जाती आणि जमातींच्या विकासासाठी 'रोड मॅप' तयार करणार'

4 वर्षांत 6 नगराध्यक्ष

4 वर्षांत 6 नगराध्यक्ष सत्तारूढ झाल्यामुळे विकासाला खीळ बसणे साहजिकच होते. सुरवातीला काँग्रेसचे असलेले 3 नगरसेवक नंतर भाजपमध्ये गेल्यामुळे काँग्रेसची पाटी कोरी झाली. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर विलियम आगियार यांनी काँग्रेसमध्ये फेरप्रवेश केल्यामुळे सध्या काँग्रेसचे खाते परत उघडले आहे. रवी नाईक भाजपतर्फे फोंड्यातून सहाव्यांदा निवडून येऊन कृषिमंत्री बनल्यामुळे सध्या फोंडा नगरपालिका मंडळ स्थिरस्थावर झाल्यासारखे वाटत आहे. रवी पुत्र रितेश नाईक हे नगराध्यक्षपदी आरूढ झाल्यामुळे सध्या विकासाला गती मिळायला सुरवात झाली आहे.

विकासाची सुरुवात

नगरपालिकेच्या नूतन इमारतीचा शिलान्यास ही या नगरपालिकेच्या विकासाची सुरवात म्हणावी लागेल. तरीही अनेक कामे प्रलंबित आहेत. त्यातले महत्त्वाचे काम म्हणजे सुवर्णमहोत्सवी प्रकल्प चालीस लावणे. रवी नाईक गृहमंत्री असताना म्हणजे 19 डिसेंबर 2011 रोजी त्याची मुहूर्तमेढ रोवली होती. पण त्यानंतर दोन नगरपालिका मंडळे येऊनही प्रकल्प ठप्प झाला. आता कृषिमंत्री नाईक यांनी हा प्रकल्प पूर्ण करण्याचे मनावर घेतल्यामुळे हा प्रकल्प चालीस लागणार, असे दिसू लागले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com