Ponda News: मोबाईलवर बोलण्याच्या नादात युवक पडला विहिरीत; फोंड्यातील घटना

युवकाला कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही
Ponda Latest News
Ponda Latest NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Ponda Latest News: मोबाईलचे व्यसन आपल्याला किती हानिकारक ठरू शकते हे दाखवणारी घटना फोंड्यात घडली आहे. 22 वर्षांचा युवक गोविंद कश्यप हा फोंड्यात एका भाड्याच्या खोलीत राहतो. मोबईलच्या नादात त्याच्या जीवाला धोका निर्माण करणारा एक प्रकार घडला आहे.

Ponda Latest News
Goa Budget 2024 Live News: दिवसभरातील सविस्तर घडामोडी वाचा एका क्लिकवर

उपलब्ध माहितीनुसार, त्याच्या खोलीजवळील एका विहिरीजवळ तो फोनवर बोलत बसला होता. बोलता बोलता अचानक त्याच्या हातून फोन निसटला. फोन विहिरीत पडणार इतक्यात त्याने तो तत्परतेने पकडण्याचा प्रयत्न केला.

या प्रयत्नांमध्ये त्याचा पाय घसरला आणि तो विहिरीमध्ये पडला. यानंतर लगेचच फोंडा अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावण्यात आले. त्यांनी त्याला विहीरीतून बाहेर काढले. विहीर जास्त खोल नसल्याने त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com