Betul News : प्रदूषणमुक्त ऊर्जा स्रोत हवेत; पेट्रोलियम मंत्री हर्षदीप पुरी

Betul News : देशात पेट्रोल,डिझेलचे दर नियंत्रणात
Betul
Betul Dainik Gomantak

Betul News : बेतूल, पारंपरिक ऊर्जा आणि प्रदूषणमुक्त ऊर्जा स्रोतांचा वापर करणे ही काळाची गरज आहे, असे पेट्रोलियम मंत्री हर्षदीप एस.पुरी यांनी सांगितले. ऊर्जा सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

यंत्रणेतील बदलामुळे जगातील सर्वाधिक देशात पेट्रोल व डिझेलच्या भावात वृद्धी होताना देशात या दोन्ही ऊर्जा स्तोत्राचे भाव नियंत्रणात राहिले आहेत. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री पुरी यांनी आज देश व उद्योगासाठी उर्जा स्रोतांची आश्वासकता या लुका वर्ल्ड चर्चा सत्रात ते बोलत होते.

या चर्चासत्रात कतार येथील एनर्जी अफेअर्स कॅबिनेट मंत्री शेरिदा अल काबी, गुयानाचे नैसर्गिक संसाधन मंत्री विक्रम भारत, ‘ओपेक’चे सरचिटणीस हैत्तम अल घाईस यांनी भाग घेतला.

जागतिक ऊर्जा स्रोतांचे उत्पादन व पुरवठा या संबंधी भाष्य करताना जगासमोर या स्रोतांचे वहन आश्वासक पद्धतीने होण्याची गरज पुरी यांनी व्यक्त केली.

Betul
Goa Assembly Budget Session 2024 3rd Day: क्रीडा स्पर्धा, 39 A, GST, ऑनलाईन कॅसिनो; अधिवेशनात तिसऱ्या दिवशी काय घडलं?

पारंपरीक ऊर्जा स्रोतांची उपलब्धता असून या प्रदूषणमुक्त व आश्वासक उर्जा स्रोतांचा वापर करणे गरजेचे आहे, असेही पुरी म्हणाले.

‘ओपेक’चे सरचिटणीस अल घाईस यांनी सांगितले,की स्रोतांचे वहन व संक्रमण हे महत्वाचे आहे त्याला अनेक पर्याय व मार्ग उपलब्ध आहेत.‘ओपेक’मध्ये आम्ही सातत्याने गुंतवणूक करीत आहोत. वीस वर्षांत शंभर बिलियन गुंतवणुकीची गरज आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com