कळंगुट हल्लाप्रकरणी संशयितांना पोलिस कोठडी

डिस्को क्लब व्यावसायिकांतील मतभेदातून कुकृत्य
Police remand suspects in Calangute attack case
Police remand suspects in Calangute attack caseDainik Gomantak
Published on
Updated on

शिवोली: कळंगुट येथील प्राणघातक हल्ला प्रकरणातील चौघा संशयितांना 12 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी बजावण्यात आल्याची माहिती कळंगुटचे पोलिस निरीक्षक नोलास्को रापोझ यांनी दिली.

Police remand suspects in Calangute attack case
राज्यात करोनामुळे होणारा मृत्यूदर आटोक्यात

नाईकवाडा-कळंगुट येथे मंगळवारी रात्री उशिरा सुरक्षा रक्षक स्वप्नील रेडकर (30, रा. तोर्डा-पर्वरी) याच्यावर जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केल्याबद्दल पोलिसांनी संशयित टारझन पार्सेकर (नागोवा) सूर्यकांत कांबळी (ताळगाव) इमरान बेपारी (सांताक्रूझ) आणि सूरज शेट्ये (मेरशी) यांना अटक केली. हे सर्व संशयित हल्ला करून सिंधुदुर्गात पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना कळंगुट तसेच पेडणे पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करून त्यांना जेरबंद केले.

Police remand suspects in Calangute attack case
बोंडला राष्ट्रीय उद्यानात पुन्हा सुरू होणार ‘राजा-राणी’ या वाघांचा संसार

कळंगुट पोलिस तसेच नाईकवाडा येथील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले डिस्को क्लब चालविणाऱ्या स्थानिक व्यावसायिकांत मतभेद निर्माण झाल्याने एकमेकांचा वचपा काढण्यासाठीच या भागात सुरक्षा रक्षकाचे काम करणारा स्वप्नील रेडकर याच्यावर संशयितांनी जीवघेणा हल्ला केल्याचे सांगण्यात आले. मंगळवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास हल्ल्याची पूर्वतयारी करून नाईकवाडा दाखल झालेल्या टारझन पार्सेकर याने प्रथम काळ्या मिरीचा फवारा रेडकर याच्या डोळ्यात मारला. त्याच्या असाहाय्यतेचा फायदा उठवत गुंड सूर्यकांत कांबळी तसेच इमरान बेपारी यांनी त्याच्या उजव्या पायाच्या मांडीवर कोयता तसेच सळीने वार केल्याने सध्या रेडकर याच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com