आठवण म्हणून बॅग आणली आणि विमानतळावर झाला घोटाळा! पोलिसांना सापडल्या वीस वर्षे जुन्या 'जिवंत गोळ्या'

Goa Crime: बॅगेत काय आहे हे न तपासताच ती वापरण्याची शिक्षा पुतण्याला तिकीट घेतलेले विमान चुकवून भोगावी लागली
Goa Crime: बॅगेत काय आहे हे न तपासताच ती वापरण्याची शिक्षा पुतण्याला तिकीट घेतलेले विमान चुकवून भोगावी लागली
Pistol BulletsCanva
Published on
Updated on

Mopa Airport

पेडणे: पुण्यातील काकीने लष्करातील निवृत्त कर्नल काकांच्या स्मृती म्हणून पुतण्याला दिलेल्या बॅगेमुळे पुतण्याला मोपा येथे पोलिस कारवाईस सामोरे जावे लागले. गोवा सोडताना त्यांना तपासासाठी यापुढे आवश्यकता भासल्यास परत पोलिसांसमोर हजर राहण्याची नोटीस स्वीकारावी लागली. बॅगेत काय आहे हे न तपासताच ती वापरण्याची शिक्षा पुतण्याला तिकीट घेतलेले विमान चुकवून भोगावी लागली.

मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज दुपारी पावणेचार वाजता अंशुल मनोजकुमार घई (वय २६) या प्रवाशाची बॅग स्कॅन करताना त्यात पिस्तुलाच्या सहा गोळ्या आढळून आल्या. बॅग उघडून तपासल्यावर जिवंत गोळ्या असल्याचे आढळून आल्याने त्याला तत्काळ मोपा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याला या गोळ्या कुठून आणल्या याविषयी काही सांगता येईना. त्याच्याकडे अग्नीशस्त्र बाळगण्याचा परवाना नव्हता की गोळ्या नेण्यासाठीचा परवाना.

यामुळे संशय बळावल्याने पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली. तपासादरम्यान अंशुल याने पोलिसांना सांगितले, की ७ रोजी तो शिर्डी येथे गेला होता. दुसऱ्याच दिवशी आपले लष्करातील कर्नल (निवृत्त) स्व. महेश घई यांच्या कोंढवा - पुणे येथील घरी तो काकी सुरेखा यांना भेटण्यासाठी गेला होता. काकांच्या स्मृती म्हणून काकांच्या वापरातील एक बॅग तिने अंशुलला दिली. तीच ही बॅग आहे. त्या बॅगेत असलेल्या गोळ्यांबाबत त्याला काहीच माहिती नव्हती. या प्रकरणाचा पुढील तपास अधीक्षक अक्षत कौशल व उपअधीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक नारायण चिमुलकर करत आहेत.

Goa Crime: बॅगेत काय आहे हे न तपासताच ती वापरण्याची शिक्षा पुतण्याला तिकीट घेतलेले विमान चुकवून भोगावी लागली
Goa Crime: पठाणकोट अपहरण प्रकरणातील आरोपी सापडले गोव्यात; निलंबित कॉन्स्टेबलसह दोघांना अटक

बॅगेतील गोळ्या २० वर्षे जुन्या

पोलिसांनी संशयिताने दिलेल्या माहितीची खातरजमा करून घेतली. त्याची काकी सुरेखा यांच्याकडूनही कर्नल काकांची बॅग न तपासताच अंशुल याला दिल्याचेही त्यांनी जाणून घेतले. त्या बॅगेतील गोळ्या २० वर्षे जुन्या असतील असे काकी म्हणाल्या. त्याविषयीही पोलिसांनी खातरजमा केली. त्यामुळे तपासासाठी उपस्थित राहण्याची नोटीस अंशुल याला बजावून त्याला सोडण्यात आले. काकांची ही स्मृती विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेण्याच्या रूपाने अंशुल यांना चिरस्मरणीय ठरली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com