पणजी: सध्या सोशल मीडियाद्वारे घडणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. Instagram वर महिलेचे फेक अकाऊंट तयार करुन त्याद्वारे मानहानी केल्याप्रकरणी उत्तर प्रेदशाच्या एकास गोवा पोलिसांच्या सायबर क्राईम पथकाकडून अटक करण्यात आली आहे.
संशयित आरोपीने इंस्टाग्रामवर एका स्थानिक महिलेचे फेक अकाउंट तयार करून तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ अपलोड केले. एवढंच नाही तर संबंधित महिलेचा खोटा आयडी वापरून या संशयिताने महिलेच्या मित्रांना फ्रेन्ड रिक्वेस्ट देखील पाठवल्या.
परिणामी महिलेची मानहानी झाल्याने तिने त्वरित तक्रार दाखल केली आणि सर्व घटनेचा सखोल तपास केल्यानंतर गोव्यातील सायबर क्राईम पथकाकडून संशयिताविरोधात गुन्हा नोंद करत त्याला अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेला आरोपी हा परप्रांतीय असून तो उत्तर प्रदेश मधील बुलंदशहारमधील आहे, वय वर्ष २५ असलेल्या या आरोपीचे नाव कन्हैय्या चौहान असल्याची माहिती समोर आली. घडलेल्या संपूर्ण प्रकाराचा आढावा घेता, सोशल मीडियाद्वारे वाढणाऱ्या गुन्हांचे प्रमाण पाहता प्रत्येकानेच वैयक्तिक पातळीवर खबरदारी घेणे आवश्यक झाले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.