Margao Session Court: वेश्याव्यवसाय प्रकरणी दोषी ठरलेल्या विजय सिंग याला गुरुवारी ठोठावली जाणार शिक्षा

Margao Session Court: दक्षिण गोव्याच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश पूजा कवळेकर यांच्या न्यायालयाने संशयिताला दोषी ठरविले होते.
Court
CourtDainik Gomantak

Margao Session Court

युवतींना वेश्याव्यवसायात जुंपण्याच्या आरोपाखाली दोषी ठरविलेल्या विजय सिंग याला आता शुक्रवारी शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.

असहाय्य युवतींना वेश्या व्यवसायात जुंपणे हा गंभीर स्वरूपाचा असून त्यामुळे त्याला कडक शिक्षा ठोठावण्यात यावी अशी मागणी सरकारी वकील उत्कर्ष आवडे यांनी केली.

दक्षिण गोव्याच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश पूजा कवळेकर यांच्या न्यायालयाने संशयिताला दोषी ठरविले होते. कोलवा पोलिसांनी संशयिताला वेश्याव्यवसाय प्रकरणात अटक केली होती.

दरम्यान या संशयिताला अटक करून त्याला शिक्षा होईपर्यंत या प्रकरणी पाठपुरावा केल्याने बायलांचो एकवोटच्या अध्यक्ष आवदा विएगस यांनी कोलवाचे तत्कालीन निरीक्षक मेल्सन कुलासो यांचे अभिनंदन केले असून हल्लीच्या काळात अशा प्रकरणात झालेली ही तिसरी शिक्षा असल्याचे त्यानी म्हटले आहे.

या प्रकरणाची माहिती अशी की कोलवा वाहन पार्किंगच्या जागी किनाऱ्याजवळ कोलवा पोलिसांनी टाकलेल्या धाडी वेळी हा वेशा व्यवसायाचा प्रकार उघड‌कीस आला होता.

यावेळी पोलिसांनी एक खोटे गिन्हाईकपाठवून आरोपी विजय सिंग याला वेश्याव्यवसायासाठी दोन मुलींना पुरविण्यासाठी आणले असता त्याला रंगेहात पकडले होते.

Court
Canacona: तपासणी टाळण्यासाठी समुद्रातून मद्य तस्करी; काणकोण येथे एकाला अटक

या प्रकरणात सरकारी वकील उत्कर्ष आवडे यांनी एकूण नऊ साक्षिदारांची साथ सादर करून संशयिताचा गुन्हा सिद्ध केला. या साक्षीत पीडित युवतीच्याही साक्षिचा समावेश होता.

त्याचप्रमाणे बायलांचो एकवट या बिगर सरकारी संघटनेच्या सदस्या डॉरीटी रॉड्रिगिज, दक्षिण गोव्याचे तत्कालिन उपजिल्हाधिकारी विशाल कुंडईकर यांचीही साक्ष पेश करण्यात आली होती.

या गुन्ह्याचा तपास कोलवा पुलिस स्थानकाचे तत्कालिन पोलिस निरिक्षक मेलसन कुलासो यांनी केला होता. सरकारी अभियोक्ता उत्कर्ष आवडे यांनी पक्षा तर्फे खटला लढविला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com