.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पेडणे, समाजातील काही लोक हे नेहमीच स्वतःबरोबर समाजाचा विकास व्हावा यासाठी कार्यरत असतात.
अशा लोकांमुळेच सामाजिक विकासाची मोठमोठी कामे उभी राहतात. विद्यार्थ्यांनी आदर्श नागरिक बनण्यासाठी अशा लोकांकडून प्रेरणा घ्यावी, असे उद्गार सभापती रमेश तवडकर यांनी काढले.
पेडणेतील नवचेतना युवक संघ व संत सोहिरोबानाथ आंबिये शासकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘श्रमधाम’ या संकल्पनेवर आधारित व्याख्यानात व्याख्याते म्हणून तवडकर बोलत होते.
यावेळी पेडणेचे आमदार तथा गोवा हस्तकला व लघुद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष प्रवीण आर्लेकर, विर्नोडा सरपंच अक्षदा सावंत, चांदेल-हंसापूर सरपंच तुळशीदास गावस, पत्रकार प्रभाकर ढगे, धारगळचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच भूषण नाईक, व्हायकाऊंट हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र बोंद्रे, संस्थेचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर, प्रा. अविनाश पाटील, उपसरपंच दामोदर नाईक, पंच सुजाता ठाकूर, मदन परब, स्वाती मालपेकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश सावळ, सूर्यकांत तोरसकर उपस्थित होते.
सभापती तवडकर यांनी यांनी आपण प्रतिकूल परिस्थितीत घेतलेल्या शिक्षणाबाबतचे अनुभवाचे कथन करून काणकोणमधील आदर्श युवक संघाची वाटचाल, शाळा उभारणी, सामाजिक कार्य, लोकोत्सव या विविध उपक्रमांची माहिती दिली. श्रमधाम योजनेबद्दल ते म्हणाले की, परस्परांना सहकार्य करण्याची सहकाराची भावना आपल्या पूर्वजांनी जोपासली आणि सामूहिक विकासाला गती दिली.
‘श्रमधाम’ ही संकल्पना त्यातूनच आली आहे. समाजात कुठलाही माणूस बेघर राहू नये, या उद्देशातून सुरू केलेल्या या उपक्रमात सामूहिक कार्याला चालना मिळालेली आहे. ही योजना आता केवळ काणकोण वा गोव्याची राहिली नाही, तर संपूर्ण देशात तिची चर्चा सुरू झाली आहे.
उपस्थित मान्यवरांनीही यावेळी विचार मांडले. रोपट्याला जल अर्पण करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक कृष्णा पालयेकर यांनी केले. सूत्रसंचालन ओंकार गोवेकर यांनी केले तर महादेव गवंडी यांनी आभार मानले.
हृदयस्पर्शी पत्राने सभापती झाले भावूक!
नवचेतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर यांनी काणकोण येथील काकू वरक यांच्या जीवनावर आधारित, त्यांना सभापतींनी बांधून दिलेल्या घराशी संबंधित असलेल्या अनुभवाचे लिहिलेले पत्र वाचून दाखवले. हे पत्र वाचताना सभापती तवडकर भावूक झाले. त्यांना अश्रू अनावर झाले. दरम्यान, या कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल कृष्णा पालयेकर आणि त्यांच्या संस्थेचे तवडकर यांनी अभिनंदन केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.