Pernem Rain : वादळी वाऱ्यामुळे पेडणे तालुक्यात पडझड सुरूच

Pernem Rain : उगवे येथे अनिल उगवेकर यांच्या घरावर पिंपळाचे झाड पडल्याने घराचे चाळीस हजारांचे तर वळपे विर्नोडा येथे उदय आरोंदेकर यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून ४५ हजारांची हानी झाली.
Pernem
PernemDainik Gomantak

Pernem Rain :

पेडणे तालुक्यात काल रात्री ८.१५ पासून वाहू लागलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली.

उगवे येथे अनिल उगवेकर यांच्या घरावर पिंपळाचे झाड पडल्याने घराचे चाळीस हजारांचे तर वळपे विर्नोडा येथे उदय आरोंदेकर यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून ४५ हजारांची हानी झाली. पराष्टे येथे मुख्य रस्त्यावर माड कोसळल्याने वीज वाहिन्याही तुटल्या. परिणामी काहीकाळ वीजपुरवठाही खंडित झाला.

खुटवळ- बैलपार येथे रस्त्यावर मोठा आम्र वृक्ष पडला, विर्नोडा येथीव उदय आरोंदेकर यांची जवानांनी दोन लाखापेक्षा जास्त मालमत्ता वाचविली.

Pernem
Goa Human Trafficking: गोव्यात कशी होते मानवी तस्करी, कोणती आमिष दिली जातात? डिजीपींनी दिली माहिती

उगवे येथे अनिल उगवेकर यांच्या पेडणे अग्नी अग्निशमन दलाचे सहायक अधिकारी प्रशांत धारगळकर, चालक राजन खरात, जवान, केतन कामुलकर, संदेश पेडणेकर, आशीर्वाद गाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन अनिल उगवेकर यांच्या घरावरील पडलेले झाड कापून दोन लाखांहून अधिकची मालमत्ता वाचविली.

पहाटे ३ वाजेपर्यंत अग्निशामक दलाच्या जवानांनी काम करून रस्त्यावर तसेच वीज वाहिन्यावर पडलेली झाडे कापून रस्ता वाहतुकीस खुला केला.या मोहिमेत सहाय्यक अधिकारी प्रशांत धारगळकर यांच्या मार्गदर्शनाखाली, हवालदार प्रदीप आसोलकर ,चालक अल्वारीस मास्कारेन्हा , राजन खरात, अमोल परब, राजेश परब, केतन कामुलकर, संदेश पेडणेकर आशीर्वाद गाड , तेजस आरोंदेकर यांनी चांगली कामगिरी बजावली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com