Pernem Muncipal Council: तीन महिन्यांपासून पगार न दिल्याने पेडणे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आजपासून संपावर जाण्याची घोषणा केली. कर्मचाऱ्यांनी पालिकेच्या समोरच आंदोलन सुरु केले.
येत्या तीन दिवसांत दोन महिन्यांचा पगार देतो असे आश्वासन नगराध्यक्षांनी दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी तात्पुरत्या काळासाठी संप मागे घेण्यात आला आहे.
पेडणे पालिकेच्या कामगार कर्मचाऱ्यांना तीन महिन्याचा पगार मिळाला नसल्यामुळे मंगळवारी सकाळी कामगार संपावर गेले. गोमंतक मजूर संघ मार्फत पालिकेसमोर आंदोलन सुरू करण्यात आले.
गोवा फॉरवर्डचे नेते दीपक कलंगुटकर यांनी पेडणे पालिका कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला. 'पगार देणे जमत नसेल तर पालिका बरखास्त करून तिचे पंचायतीत रूपांतर करावे.' अशी प्रतिक्रिया कलंगुटकर यांनी दिली.
दरम्यान, पेडणे पालिकेच्या कर्मचाऱ्यांना 3 दिवसात दोन महिन्याचा पगार देणार असल्याची ग्वाही पेडणे पालिका नगराध्यक्ष सिद्धेश पेडणेकर यांनी दिली आहे. त्यामुळे तात्पुरते धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.