Pernem News : न्हयबाग येथे ‘उड्डाणपूल’च पर्याय; स्थानिक रहिवाशांचे मत

Pernem News : पणजीहून मुंबईच्या दिशेने जाताना या नव्याने बांधलेल्या मार्गावर उतरणीपूर्वी मोठे वळण आहे. ही उतरण संपताच दोन्ही बाजूने पेडणे व सातार्ड्याला जाणारे महामार्गाला जोडलेले रस्ते आहेत.
Pernem News : न्हयबाग येथे ‘उड्डाणपूल’च पर्याय; स्थानिक रहिवाशांचे मत
Dainik Gomantak

Pernem News :

पेडणे, न्हयबाग येथील जुने जंक्शनवर सतत अपघात होत असल्याने त्या ऐवजी नवीन चारपदरी मार्ग करताना जुन्या जंक्शनपासून सुमारे तीनशे मीटर अंतरावर महामार्ग ६६ साठी नवे जंक्शन बांधले. पण हे जंक्शनही तशाच स्वरूपाचे असून तिथेही अपघात घडत असून उड्डाण पूल हाच, अपघात टाळण्याचा एकमेव पर्याय आहे,असे मत स्थानिक रहिवाशांचे बनले आहे.

यापूर्वी जुन्या म्हणजे राष्ट्रीय महामार्ग क्र. १७ वर न्हयबाग येथे असलेले जंक्शन हे उतरणीवर होते, वळण असल्याने वाहनधारकांचा गोंधळ उडवणारे होते. त्यामुळे तिथे अनेकदा अपघात होत असत.या जुन्या जंक्शनवर बरेच भीषण अपघातही झाले. त्यात कित्येकांचे बळीही गेले. काहीजण कायमचे जायबंदी झाले.

याचा विचार करुन चारपदरी मार्ग करताना या जंक्शन पासून सुमारे तीनशे मीटर अंतरावर नवीन जंक्शन बांधले. पण ज्या जंक्शनमुळे अपघात होतात म्हणून चारपदरी महामार्ग करताना नव्या जंक्शनसाठी निवडलेली जागाच काय ती नवीन असून बाकी ज्या कारणामुळे जुन्या जंक्शनवर अपघात होत असत, तीच कारणे आणि दोष या नव्या जंक्शनवर अपघात घडवत आहेत.

पणजीहून मुंबईच्या दिशेने जाताना या नव्याने बांधलेल्या मार्गावर उतरणीपूर्वी मोठे वळण आहे. ही उतरण संपताच दोन्ही बाजूने पेडणे व सातार्ड्याला जाणारे महामार्गाला जोडलेले रस्ते आहेत. महामार्गावरून पेडणे किंवा सातार्ड्याला जायच्या रस्त्यावर वाहन घ्यायचे असेल एक लेन सोडून दुसऱ्या बाजूला जाताना मुंबई -पणजी मार्गावर धावणारे एखादे वाहन मागून केव्हा धडक देईल, याची शाश्वती नसते. महामार्गाच्या चुकीच्या रचनेमुळे येथे दीड दोन महिन्यात दोन मोठे कंटेनर उलटून अपघात झाले आहेत.

न्हयबाग येथे राष्ट्रीय महामार्गावर जो नाका म्हणून केलेला आहे तो मृत्यूचा सापळा बनला आहे.सुसाट वेगात येणाऱ्या वाहनांमुळे ह्या रस्त्यावरून पलिकडे कसे जावे, किंवा महामार्गावर कसे यावे, अशी भयानक स्थिती निर्माण झालेली आहे. पत्रादेवी ते महाखाजन पर्यंतचे संमत झालेले उड्डाणपूल का रद्द केले, हे आम्हाला कळणे आवश्यक आहे.

-ॲड. जितेंद्र गावकर, पोरस्कडे

Pernem News : न्हयबाग येथे ‘उड्डाणपूल’च पर्याय; स्थानिक रहिवाशांचे मत
Goa Smoking Addiction: गोव्यात मुलांपेक्षा मुलींमध्ये धूम्रपानाचे प्रमाण अधिक, ग्रामीण भागात युवक गुटख्याच्या आहारी

पंचायतीतर्फे आम्ही महामार्ग ६६, सार्वजनिक महामार्ग बांधकाम खाते, पेडणे उपजिल्हाधिकारी या सह सर्व संबंधितांना उड्डाणपूल उभारावा,अशी मागणी केली होती.त्यानुसार उड्डाणपूल संमतही झाला होता. पण नंतर तो कसा व का रद्द झाला हे कळत नाही. येथे अपघात होऊ नयेत म्हणून जंक्शनजवळ रुंदीकरण, सूचना फलक, सिग्नल आदी शिफारशी केल्या. मात्र काही सूचना अंमलात आल्या नाहीत.

-एकनाथ तेली, पंचायत सदस्य

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com