Parra News : चरात अडकलेल्या २ म्हशींना वाचवले; भूमिगत वीजवाहिन्यांच्या चरामुळे धोका

Parra News : बुधवारी सकाळी मालक रघू माईणकर यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
Parra
Parra Dainik Gomantak

Parra News :

पर्ये, केरी पंचायत क्षेत्रातील पेळावदा, रावण भागात भूमिगत वीज वाहिनीसाठी खोदलेल्या चरात पडलेल्या दोन म्हशींना मोठ्या कष्टाने वाचविण्यात आले. मंगळवारी रात्री या दोन्ही म्हशी चरात अडकल्या होत्या, पैकी एकीला हलताही येत नव्हते.

बुधवारी सकाळी मालक रघू माईणकर यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर इतर ग्रामस्थही जमा झाले. याबाबत चर खोदाई करणाऱ्या कंत्राटदाराला माहिती दिल्यावर जेसीबी यंत्र व कामगारांना घेउन घटनास्थळी दाखल झाले.

त्यानंतर कामगार व स्थानिकांनी मिळून व जेसबीच्या साहाय्याने संलग्न मोठा चर खोदून दोन्ही म्हशींना सुखरूप बाहेर काढले. दोन्ही म्हशी चरात अडकल्या होत्या.

भूमिगत चर खोदकाम करतेवेळी कंत्राटदाराने सावधगिरी बाळगणे आवश्‍यक आहे. १०० मीटर चर खोदल्यावर लगेच वाहिनी टाकून चर बुजविणे आवश्‍यक आहे. परंतु तब्बल सुमारे २ की.मी. चर खोदून उघडा ठेवला आहे. या भागात पशुपालन मोठ्या प्रमाणात केले जात असल्याने पाळीव जनावरांसाठी हा चर धोकादायक ठरला आहे. वीज वाहिन्या घालून तातडीने हा चर बुजविण्याची मागणी होत आहे.

Parra
Goa Today's Top News: भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल, काँग्रेसचा रामनवमीचा मुहूर्त; गोव्यातील ठळक बातम्या

वीज खात्याच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष:

भूमिगत वीजवाहिन्या घालण्याचे काम कंत्राटदारामार्फत केले जात असले तरी या कामावर निगराणी ठेवण्याची जबाबदारी वीज खात्याची आहे. परंतु वीज खात्याचे अधिकारी या कामाकडे ढुंकूनही पाहत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कंत्राटदार आपल्या सोयीनुसार काम करीत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com