Smart City Panaji: उरले फक्त 18 दिवस! सांतिनेजमधील रस्‍ते पूर्ण होणार कधी?

Smart City Panaji: त्यामुळे आता सांतिनेजमधील ‘वेलनेस’ फार्मसीसमोरील चौकातील रस्‍ता तसेच काकुलो मॉलसमोरील रस्त्याचे काम कधी मार्गी लागणार, हे पाहावे लागणार आहे.
Smart City Panaji
Smart City PanajiDainik Gomantak

Smart City Panaji

राजधानी पणजीत ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत सुरू असलेली कामे ३१ मेपर्यंत पूर्ण होतील, असे आश्‍वासन राज्‍य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला दिले आहे.

त्यामुळे आता सांतिनेजमधील ‘वेलनेस’ फार्मसीसमोरील चौकातील रस्‍ता तसेच काकुलो मॉलसमोरील रस्त्याचे काम कधी मार्गी लागणार, हे पाहावे लागणार आहे.

इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडच्या वतीने (आयपीएससीडीएल) ३१ मे या तारखेपर्यंत कामे पूर्ण करण्यात येतील, असे पणजीतील नागरिकांना वारंवार आश्‍वस्त करण्‍यात आले आहे. आजपासून (सोमवार) अठरा दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे.

या कालावधीत पणजीतील रस्त्यांची आणि गटारांची कामे होणे शक्य वाटत नाही. सांतिनेजमधील वेलनेस फार्मसीसमोर ‘वाय’ आकाराच्या मार्गावरील जोडभागात गटारांचे काम करण्याचे राहिले आहे. हे काम जोपर्यंत मार्गी लागणार नाही, तोपर्यंत रस्ता तयार करण्याचे काम पूर्ण होणार नाही हे निश्‍चित.

Smart City Panaji
Goa Police : गोवा पोलिसांची विश्वासार्हता वेशीवर; पोलिसानेच पुरवली गुन्हेगारांना माहिती

‘हमारा स्कूल’ शेजारील सरकारी जागेत असणाऱ्या अस्थापनांचा त्या गटारांना अडथळा होत आहे, हे वारंवार आयपीएससीडीएलने महानगरपालिकेच्या लक्षात आणून दिले आहे. तरीही ती अडथळा ठरणारी बांधकामे हटविली जात नाहीत.

येथील आस्थापनांच्या पायऱ्यांपर्यंत जरी खोदकाम केले असले तरी सरकारी जागेतील आस्थापने हटविल्यास चारचाकी वाहन याठिकाणी सहजपणे उजव्या आणि डाव्या बाजूला वळविणे शक्य होणार आहे. मात्र, अडथळा ठरणारे बांधकाम हटणे आवश्‍यक आहे. आत्तापर्यंत या मार्गावरच्या बगल इमारतीच्या मागून ये-जा करणाऱ्यांच्याही सदर काम का रखडले आहे, हे कधी लक्षात येत नाही.

काकुलो मॉल येथील रस्ता सर्वात पहिल्यांदा उखडून टाकला होता. अग्निशामक दलाच्या मुख्यालयापासून ते मलनि:स्सारण प्रक्रिया प्रकल्पापर्यंत भूमिगत वाहिनी टाकण्याचे काम आव्हानात्मक होते, म्हणून विलंब लागला असे सांगितले जात होते. परंतु आता हे काम झाले असले तरी रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरूवात कधी होणार, हे काही आयपीएससीडीएलच्या अधिकाऱ्यांनाही सांगता येत नाही.

बेकायदा बांधकामांना राजकीय आशीर्वाद!

खऱ्या अर्थाने जनतेने याविरोधात आवाज उठवणे आवश्‍यक आहे. राजकीय दबावामुळे बांधकाम न हटल्याने रस्ता होत नाही. येथील झाडे हटविण्याचे काम सुरू असताना बिगरसरकारी संघटनांचे प्रतिनिधी अटकाव करण्यासाठी आले. पण रस्त्याला अडथळा ठरणारी बेकायदा बांधकामे वाचविण्यासाठी सुरू असलेल्या खटाटोपाविरोधात कोणीच काही बोलत नाहीत.

आयपीएससीडीएलच्या वतीने मे महिन्याच्या सुरूवातीपर्यंत विवांता चौक ते मधुबन कॉलनी हा रस्ता खुला केला जाईल, असे सांगितले गेले होते. मात्र, आता मे महिन्याच्या अखेरपर्यंत तरी हा रस्ता पूर्ण होऊन वाहतूक खुली होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

पणजी शहरात सुरू असलेली स्मार्ट सिटीची कामे ३१ मेपर्यंत पूर्ण केली जातील, असे सरकारने तसेच संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले असले तरी ती पूर्ण होतील असे वाटत नाही. शिवाय ३१ मे ही मुदत यंदाची की २०२५-२०२६ वर्षाची म्हणून पणजीकरांनी पकडायची हे सांगायला हवे.

- सुरेंद्र फुर्तादो, नगरसेवक.

Smart City Panaji
South Goa : दक्षिणेत काँग्रेसचा ७ हजारांच्‍या मताधिक्‍याने विजय शक्‍य; पक्षाच्या विश्‍लेषकांचा दावा

स्मार्ट सिटीची कामे ३१ मेपर्यंत पूर्ण होण्याची कोणतीच चिन्हे सध्‍या दिसत नाहीत. पणजीतील कोणत्याही नागरिकाला विचारले तरी त्याचे हेच उत्तर असेल. परंतु घिसाडघाईने कामे झाली तर त्याचा विपरित परिणाम पुढे दिसून येईल. त्यामुळे कामाचा दर्जा राखणेही गरजेचे आहे.

- प्रमेय माईणकर, नगरसेवक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com