Panaji News : सांतिनेज खाडीतील गाळउपसा पूर्णत्वाकडे; साडेतीन किलोमीटरच्या जलप्रवाहाला पुनरुज्जीवित करणार

Panaji News : साडेतीन किमी लांबीच्या खाडीचे पुनरुज्जीवन करण्याचा हा प्रयत्न आहे. जलस्रोत खात्या(डब्ल्यूआरडी)सोबत सल्लामसलत करून हाती घेतलेला हा प्रकल्प पावसाळ्यापूर्वी पूर्णत्वास आणण्याचा ‘आयपीएससीडीएल’चा प्रयत्न आहे.
Panaji
Panaji Dainik Gomantak

Panaji News :

पणजी, सांतिनेज खाडीतील गाळ काढून तिची खोली वाढवण्याचे आणि डिसिल्टिंगचे काम पूर्णत्वाकडे येत आहे, अशी माहिती इमेजीन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेडने (आयपीएससीडीएल) दिली आहे.

साडेतीन किमी लांबीच्या खाडीचे पुनरुज्जीवन करण्याचा हा प्रयत्न आहे. जलस्रोत खात्या(डब्ल्यूआरडी)सोबत सल्लामसलत करून हाती घेतलेला हा प्रकल्प पावसाळ्यापूर्वी पूर्णत्वास आणण्याचा ‘आयपीएससीडीएल’चा प्रयत्न आहे.

हे काम पूर्ण झाल्यानंतर या खाडीतून वाहून जाणारे पावसाचे पाणी सुरळीत प्रवाहित होऊन मांडवी नदीला मिळणार आहे. या खाडीत अंदाजे ७१ हजार घनमीटर गाळ आहे आणि तो काढण्यासाठी उत्खननाला लागणारी यंत्रणा, मनुष्यबळ कार्यान्वित करण्यात आले आहे. पावसाळ्यातील वाहून जाणाऱ्या पाण्याचे अडथळे टाळण्यासाठी आणि पुराचे धोके कमी करण्यासाठी या खाडीचे नियमित डिसिल्टिंग आणि साफसफाई आवश्यक आहे.

Panaji
Goa SSC Result Declared: यंदाही मुलीच हुश्शार, गोव्यात दहावीचा 92.38 टक्के निकाल

सांतिनेज खाडीचे डिसिल्टिंग आणि खोली वाढविणे, खाडीभोवतीचे अतिक्रमण टाळणे, कडा कोसळणे यासाठी कामराभाट (ताळगाव) पासून पणजीपर्यंत जलमार्गाच्या दोन्ही बाजूला संरक्षक

भिंतीची उभारणी, खाडीतील पाण्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी वायू निर्मितीसाठी साठवण संरचना तयार करण्याचा प्रयत्न राहणार अाहे.

शहरातील नागरिकांचे शहरी जीवन सुधारण्यासाठी ‘आयपीएससीडीएल’ काम करीत आहे. खाडीची स्वच्छता आणि डिसिल्टिंग करून शहराला पावसाळ्यात प्रतिकूल परिणामांपासून सुरक्षित ठेवण्याचा हा एक भाग असून त्यासाठी नियोजनबद्धरीत्या काम केले जात असल्याचे ‘आयपीएससीडीएल’च्या उच्च अधिकाऱ्याने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com