Panaji News : सांताक्रुझमध्ये सत्तानाट्य; उपसरपंचपदी सावंत

Panaji News : सत्ताधारी गटाचा विजय झाल्याने उद्या (ता. १७) सांताक्रुझ सरपंचांवरील अविश्‍वास ठरावासाठी मतदान होणार असले तरी विरोधी गटाचे मनसुबे उधळले गेले आहेत. ११ पंचायत सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीत ६ सदस्यांनी सरपंच आणि उपसरपंचांविरुद्ध अविश्‍वास ठराव दाखल केला आहे.
Panaji
Panaji Dainik Gomantak

Panaji News :

पणजी, सांताक्रुझचे सरपंच आणि उपसरपंचांवर अविश्‍वास ठराव आणणाऱ्या गटातील दोन पंचसदस्यांनी एका रात्रीत कोलांटी उडी मारल्याने सत्ताधारी गटाला खाली खेचण्याचा डाव त्यांच्याच अंगाशी आला.

उपसरपंच एल्सन ब्रागांझा यांनी राजीनामा दिल्याने आज या पदासाठी निवडणूक झाली. दोन माजी उपसरपंचांसह तिघांनी अर्ज केले होते. मात्र, पंच संदीप सावंत ऐनवेळी सत्ताधारी गटाला मिळाल्याने त्यांनी ७ विरुद्ध ४ मतांनी विजय मिळविला.

सत्ताधारी गटाचा विजय झाल्याने उद्या (ता. १७) सांताक्रुझ सरपंचांवरील अविश्‍वास ठरावासाठी मतदान होणार असले तरी विरोधी गटाचे मनसुबे उधळले गेले आहेत. ११ पंचायत सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीत ६ सदस्यांनी सरपंच आणि उपसरपंचांविरुद्ध अविश्‍वास ठराव दाखल केला आहे.

Panaji
Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा प्रवासासाठी आता तीन पर्याय; महाराष्ट्र सरकारकडून आणखी दोन महामार्गांचा प्रस्ताव

मात्र, दरम्यानच्या काळात उपसरपंच एल्सन ब्रागांझा यांनी राजीनामा दिल्यामुळे अविश्‍वास ठराव रद्द करून या रिक्त पदासाठी आज निवडणूक घेण्यात आली. सत्ताधारी गटातर्फे फुटीर संदीप सावंत आणि एल्सन ब्रागांझा यांनी तर विरोधी गटातून डॉमनिक परेरा यांनी उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल केले. कोणीही अर्ज मागे घेतले नाहीत. त्यामुळे निवडणूक अधिकारी संदेश नाईक यांनी निवडणूक प्रक्रिया राबविली.

विरोधी गटातील संदीप सावंत आणि लाफिरा ऑलिव्हेरा हे दोन दिवसांच्या घडामोडीत सत्ताधाऱ्यांना जाऊन मिळाले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची संख्या ७ तर विरोधी गटाकडे फक्त ४ पंचसदस्य राहिले. तरीही डॉमनिक परेरा यांनी ही निवडणूक लढविली. संदीप सावंत आणि लाफिरा ऑलिव्हेरा यांनी विकास होत नसल्याचे कारण देऊन सरपंच व उपसरपंचांवरील अविश्‍वास ठरावावर सह्या केल्या होत्या. मात्र, सरपंचांनी त्यांच्या प्रभागातील कामे प्राधान्यक्रमाने पूर्ण करण्याच्या दिलेल्या आश्‍वासनामुळे त्यांना पाठिंबा दिल्याचे या दोघांनी स्पष्टीकरण दिले.

सांताक्रुझ पंचायत क्षेत्रात गेल्या दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. पंचायत घरासाठी भूसंपादन प्रक्रियेनंतर फाईल शहर व नगर नियोजन खात्याकडे गेली आहे. मात्र, कालापूर कोमुनिदादने ती सीआरझेडमध्ये मोडत असल्याचा दावा करून हरकत घेतली आहे.

‘एक खोके ऑल ओके’

अविश्‍वास ठराव आणलेल्या गटाचे नेते डॉमनिक परेरा म्हणाले की, संदीप आणि लाफिरा हे माझ्यासोबत होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी संपर्क तोडला. तेव्हाच ‘एक खोके ऑल ओके’नुसार उलाढाली झाल्याचा संशय आला. विकासकामे व्हावीत म्हणून हा ठराव आणला होता. मात्र, निवडणुकीत पराभव झाला तरीही लोकांची कामे व गावाचा विकास करण्यासाठी त्यांचा चारजणांचा गट लोकांबरोबर असेल, असे त्यांनी सांगितले.

सत्तेसाठी रोझी आल्या लंडनहून गोव्यात

येथील माजी सरपंच तथा विद्यमान पंचसदस्य रोझी फर्नांडिस या लंडनला गेल्या होत्या. त्या विरोधी गटातील डॉमनिक परेरा यांच्यासोबत होत्या. सरपंच व उपसरपंचांवरील अविश्‍वास ठराव पत्रावर त्यांची सही महत्त्वाची असल्याने त्यांना गोव्यात बोलावले.

अन्यथा त्यांचा पाठिंबा नसल्यास सत्ताधारी व विरोधी यांच्याकडे समान (५-५) बलाबल झाले असते. परदेशातून काही दिवसांतच तातडीने गोव्यात येण्यामागील कारण विचारले असता रोझी म्हणाल्या की, मी लोकसभा निवडणुकीसाठी गोव्यात आले होते. त्याचवेळी हा ठराव मांडल्याने मी परेरा यांना पाठिंबा दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com