Goa Agriculture : नाचणी लागवडीसाठी प्रती हेक्टर २० हजाराची मदत

Goa Agriculture : रब्बी हंगामात राज्यातील वांयगणी शेती पडिक राहत होती, परंतु गेल्या वर्षी आम्ही शेतकऱ्यांना वायंगणामध्ये नाचणी लागवडीसाठी प्रोत्साहित केले.
Agriculture
Agriculture Dainik Gomantak

Goa Agriculture :

पणजी, भरड धान्याचे सेवन करणे किती गरजेचे आहे हे आता लोकांना कळले आहे. भरड धान्य लागवडीमुळे शेतकऱ्यांच्या मिळकतीत देखील वाढ झाली आहे.

राज्य सरकारकडून भरड धान्य लागवडीसाठी प्रती हेक्टर २० हजार रुपये अनुदान तसेच लागवडीसाठी लागणारे बीज पुरविण्यात येते. ही योजना भरड धान्य वर्षांच्या अनुषंगाने सुरू करण्यात आली होती यंदा देखील ही योजना कायम राहणार असल्याचे कृषी संचालक नेव्हील आल्फोन्सो यांनी सांगितले.

Agriculture
Flights To Goa: छत्रपती संभाजीनगर ते गोवा थेट विमानसेवेची घोषणा, जूनपासून आठवड्याला तीन फ्लाईट्स

आल्फोन्सो म्हणाले की, गेल्या वर्षी म्हणजे २०२३ साल हे जागतिक भरड धान्य वर्ष म्हणून जाहीर करण्यात आले होते. त्यानिमित्ताने भरड धान्याची जागृती व्हावी नागरिकांना त्याचे महत्त्व कळावे यासाठी केंद्र सरकार तसेच राज्य सरकारकडून विविध योजना, कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

त्याचा परिणामस्वरूप राज्यात २० हेक्टरवर करण्यात येणाऱ्या नाचणी लागवडीत वाढ होऊन ५० हेक्टरपर्यंत पोहोचली. भरड धान्याबाबत जनसामान्यात जागृती झाली. कृषी संचालनालय तसेच राज्य सरकारने आयोजित विविध कार्यक्रमांमुळे भरड धान्याला चांगले दिवस आल्याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.

पडिक वांयगणी शेतीत लागवड

रब्बी हंगामात राज्यातील वांयगणी शेती पडिक राहत होती, परंतु गेल्या वर्षी आम्ही शेतकऱ्यांना वायंगणामध्ये नाचणी लागवडीसाठी प्रोत्साहित केले. त्याला चांगला प्रतिसात लाभला. या उपक्रमामुळे पडिक वांयगणी शेती काही प्रमाणात लागवडीखाली आली. तसेच शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न लाभले. भरड धान्याला, राज्यात पिकणाऱ्या नाचणीला चांगली मागणी असून शेतकऱ्यांनी भरड धान्याची लागवड करावी, असे आवाहनही आल्फोन्सो यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com