Panaji News : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, ख्रिस्ती समुदाय आमच्यासोबत

Panaji News : गोव्यात अनेक वर्षे भाजप सरकार सत्तेवर आहे आणि ख्रिश्‍चन समाजाचे सहकार्य मिळाले नाही, असा आरोप आम्ही करू शकत नाही. आमच्याकडून त्यांना सहकार्य करण्याचे अधिकाधिक प्रयत्न झाले पाहिजेत आणि तसे प्रयत्न सुरू आहेत, असे मोदी यांनी म्हटले आहे.
Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra Modi Dainik Gomantak

Panaji News :

पणजी, देशातील तसेच गोव्यातील ख्रिस्तीबांधवांचा मतांचा टक्का लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या समाजाला चुचकारण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.

गोव्यात अनेक वर्षे भाजप सरकार सत्तेवर आहे आणि ख्रिश्‍चन समाजाचे सहकार्य मिळाले नाही, असा आरोप आम्ही करू शकत नाही. आमच्याकडून त्यांना सहकार्य करण्याचे अधिकाधिक प्रयत्न झाले पाहिजेत आणि तसे प्रयत्न सुरू आहेत, असे मोदी यांनी म्हटले आहे.

एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधानांनी हे वक्तव्य केले आहे. ईशान्येकडील राज्यांत आमची (भाजपची) सरकारे आहेत, त्यात बहुतांश ख्रिस्ती समुदायातील मुख्यमंत्री आहेत. शिवाय केंद्रीय मंत्रिमंडळातही ख्रिस्ती सदस्य आहेत. त्याठिकाणी ख्रिस्ती समाजाची मतेच अधिक आहेत. त्यामुळेच तिथेही आमचे सरकार आहे.

केरळचेच उदाहरण घ्या, बुथपासून राष्ट्रीय स्तरापर्यंत ख्रिस्ती समाजाचे नेते आहेत. ख्रिस्ती समाजाचे नेते किंवा बिशप यांच्याशी माझ्या वर्षभरात किमान पाच ते सहावेळा भेटीगाठी होतात. मी स्वतः येथे ख्रिसमस सण मोठ्या उत्साहात साजरा करतो. डावी लोकशाही आघाडी (एलडीएफ) आणि युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (यूडीएफ) यांच्यामुळे ख्रिश्‍चन समुदाय त्रासलेला आहे. या समुदायाने माझ्याकडे तक्रारही केली आहे. चर्चमध्ये त्यांनी वाद सुरू केले आहेत. त्यांनी चर्चलाही आर्थिक संकटात टाकले आहे. अशा कठीण स्थितीत हा समाज केरळमध्ये जगत आहे, असेही त्यांनी नमूद केले.

मोदी म्हणाले की, आम्ही किनारी भागातील मच्छीमार समुदायासाठी विविध कामे करत आहोत. ब्ल्यू इकॉनॉमीचा त्यांना फायदा व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. ख्रिस्ती समुदायाचा आरोग्य आणि शिक्षण क्षेत्राशी घनिष्ठ संबंध आहे. मी व्हॅटिकन येथे होली पोपनाही भेटलो होतो. त्यांना आम्ही केलेल्या कामांची माहिती आहे. अनेक विषयांवर माझी त्यांच्याशी चर्चा झाली आहे.

Prime Minister Narendra Modi
Kolhapur-Goa: कोल्हापूरच्या महिलेने पोटच्या मुलीला एक लाख रुपयांना गोव्यात विकले, नोटरीद्वारे झाला व्यव्हार

मुख्यमंत्र्यांनंतर पंतप्रधानांचे आवाहन

काही दिवसांपूर्वी कार्डिनल फिलीप नेरी फेर्रांव यांनी ख्रिस्ती मतदारांनी धर्मनिरपेक्ष उमेदवारांना मत देण्याचे आवाहन केले होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या आवाहनाचे स्वागत केले होते. काँग्रेसपेक्षा भाजप हाच धर्मनिरपेक्ष पक्ष असल्याने कार्डिनल यांनी केलेल्या वक्तव्याचा भाजपला फायदा होणार असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला होता.

आता पंतप्रधानांनी पुन्हा ख्रिस्ती समुदायाला चुचकारले आहे. त्याचा निश्‍चित किती फायदा होणार, हे लोकसभा निकालानंतरच दिसून येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com