Panaji News : फळदेसाई खंडणी प्रकरणाला राजकीय रंग

Panaji News : अटक केलेला संशयित सावित्री कवळेकरांचा समर्थक असल्याची माहिती
Minister Subhash Phaldesai
Minister Subhash PhaldesaiDainik Gomantak

Panaji News :

पणजी, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांना फोन करून २० कोटी रुपयांची खंडणी मागणारी व्यक्ती मंत्री फळदेसाई यांचा दूरचा नातेवाईक असून तो फळदेसाई यांचा विरोधक तसेच माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या पत्नी सावित्री कवळेकर यांचा समर्थक असल्याची माहिती गुन्हा अन्वेषण विभागातील सूत्रांकडून मिळाली.

गेल्या काही दिवसांपासून मंत्री सुभाष फळदेसाई यांना मिथिल देसाई या रिवण येथे राहणाऱ्या व्यक्तीकडून फोनवरून २० कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकीचे फोन येत होते. त्याने फोनवरून मंत्र्यांना तसेच त्यांच्या पत्नी आणि मुलीबद्दल अनुदगार काढत धमकी दिल्याचे फळदेसाई यांनी तक्रारीत म्हटले होते.

Minister Subhash Phaldesai
Goa Crime News: पेडण्यात टॅक्सीचालकांनी आणले कोनाडकरांचे खून प्रकरण उघडकीस

यानंतर पोलिसांनी मिथिल देसाई याला ताब्यात घेत त्याच्याकडून भ्रमणध्वनी जप्त केला होता.या प्रकरणात अटक झालेला संशयित मिथिल देसाई हा मंत्री फळदेसाई यांच्या दूरचा नातेवाईक असून तो माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या पत्नी सावित्री कवळेकर यांचा समर्थक असल्याची माहिती पोलिसांनी दिल्याने या प्रकरणाला राजकीय रंग चढला आहे. मिथिल हा समर्थक असला, तरी सावित्री कवळेकर यांचा या प्रकरणाशी अजिबात संबंध नाही.

Minister Subhash Phaldesai
ED Goa: गोव्यातील विपुल शिपयार्ड कंपनीवर ईडीचा छापा, 12.20 कोटींची मालमत्ता जप्त

...तर फळदेसाई जबाबदार

पोलिसांनी सांगितले की, मंत्री फळदेसाई यांच्याकडून त्या संशयित व्यक्तीचे ''व्हॉट्स ॲप चॅट्स'' पोलिसांनी आपल्याकडे घेतले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र, संशयित मिथिल याने त्याच्या जीवाला काही बरे-वाईट झाल्यास मंत्री फळदेसाई यांना जबाबदार धरावे, असे म्हटले आहे.

आणखी काहीजण रडारवर

गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांशी संपर्क साधला असता असे समजले की, अटक केलेल्या संशयित व्यक्तीच्या संपर्कात असलेल्या त्याच्या ९ ते १० निकटवर्तीय लोकांना पोलिस चौकशीसाठी बोलावणार आहेत. याप्रकरणी गुरुवारी आणखी एका व्यक्तीची चौकशी करण्यात आली असून पुढील काही दिवसांत आणखी काहीजणांची चौकशी पोलिस करणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com