Panaji News : तरीही दहावी, बारावी परीक्षा पद्धत अबाधित

Panaji News : नव्या शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांचे तालुकावार दौरे
Goa Education
Goa EducationDainik Gomantak

Panaji News :

पणजी, राज्य अभ्यासक्रम आराखड्यात शालेय स्तरावर औपचारिक विषय म्हणून व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. जेव्हा राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार केला जात होता, तेव्हा बोर्डाच्या परीक्षांना (इयत्ता १० वी आणि इयत्ता १२ वी) दिले जाणारे महत्त्व कमी होईल, असा अंदाज होता. मात्र, राज्य अभ्यासक्रम आराखड्याच्या मसुद्यानुसार या परीक्षा सुरू राहणार आहेत.

प्रस्तावित राज्य अभ्यासक्रम आराखड्यामध्ये भारतीय ज्ञान प्रणालीवर भर देण्यात आला आहे. त्यातून इतिहासातील प्राचीन भारतीय संदर्भांचा आधुनिक शिक्षणामध्ये समावेश करण्याचा उद्देश आहे.

यंदा नववीमध्ये नवे शैक्षणिक धोरण लागू केल्यानंतर शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांच्या समस्या ऐकण्यासाठी शिक्षण खात्याच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तालुकावार दौरे सुरू केले आहेत. सांगे, केपेतील ६० शाळांच्या प्रतिनिधींच्या समस्या शुक्रवारी ऐकल्यानंतर आज (शनिवारी) दिवसभर सासष्टीतील ७० शाळांच्या समस्या त्यांनी ऐकून घेतल्या.

Goa Education
IND vs ENG, 4th Test: जो रुट बनला संकटमोचक! शतकासह इंग्लंडला पहिल्या दिवशी करून दिल्या 300 धावा पार

ऑगस्टमध्येही कैफियत ऐकणार

प्रसाद लोलयेकर म्हणाले की, आम्ही पुन्हा यंदा ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये समस्या ऐकण्यासाठी दौरे करू. सोमवारी कुजिरा येथील हेडगेवार विद्यालयात ६० विद्यालयांच्या प्रतिनिधींना भेट दिली जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com