Panaji News : फिरत्या वाहनांतील, वीज खांबांवरील जाहिरात फलक खंडपीठाच्या रडारवर

Panaji News : वाहतूक खात्याने राज्यात सुमारे ९१ फिरत्या वाहनांवर जाहिरात फलक प्रदर्शित करण्यास परवानगी दिली आहे. तसेच रस्त्यावरील खांबांवर निविदा काढून परवानगी देण्यात आली आहे.
Panaji
Panaji Dainik Gomantak

Panaji News :

पणजी, राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या बाजूला उभी केली जाणारी जाहिरात फलक प्रदर्शित करणारे वाहने आणि रस्त्यांवरील वीज खांबांवर प्रदर्शित केले जाणारे जाहिरात फलक याची मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दखल घेतली आहे.

वाहतूक खात्याने राज्यात सुमारे ९१ फिरत्या वाहनांवर जाहिरात फलक प्रदर्शित करण्यास परवानगी दिली आहे. तसेच रस्त्यावरील खांबांवर निविदा काढून परवानगी देण्यात आली आहे. हे परवाने कोणत्या नियमानुसार व मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे देण्यात आले आहेत याचे स्पष्टीकरण खंडपीठाने वाहतूक खात्याकडे मागितले आहे. बेकायदा होर्डिंग्सबाबत खंडपीठाने घेतलेल्या या स्वेच्छा याचिकेवरील सुनावणी पुढील ३ मे रोजी ठेवली आहे.

गोवा खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार शुक्रवारी वाहतूक खाते तसेच पीडब्ल्यूडी खात्यातर्फे प्रतिज्ञापत्राद्वारे माहिती सादर करण्यात आली. जाहिरात होर्डिंग्ससाठी देण्यात येणाऱ्या परवानीसंदर्भात वेळोवेळी काढण्यात आलेल्या परिपत्रकांची व सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांची देण्यात आली.

या परिपत्रकानुसार प्रवासी बसेस व टॅक्सी यांनाच जाहिरातीसाठी परवानगी असून व्यावसायिक वाहनांसाठी त्याचा उल्लेख त्यात नाही. त्यामुळे रस्त्याच्या बाजूने उभी करण्यात येणाऱ्या वाहनांवर जाहिरातीची होर्डिंग्ज उभे केलेले असतात. अनेकदा ही वाहने सार्वजनिक परिसरात उभी करून ठेवल्याने पार्किंगला अडथळा करतात.

अनेक दिवस ती एकाच ठिकाणी उभी करून ठेवलेली असतात त्यामुळे वाहतूक खात्याने राष्ट्रीय व राज्य महामार्गासाठी असलेल्या मार्गदर्शक तत्त्वे याची पडताळणी करावी. स्वेच्छा याचिकेतील ॲमिकस क्यूरीनीही या दोन्ही महामार्गाच्या मार्गदर्शक तत्वांसंदर्भात कायद्यात त्याची अंमलबजावणी आहे का याची माहिती घेऊन ती द्यावी असे निर्देश देण्यात आले आहेत.

उपस्थित काही प्रश्‍न

राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या जंक्शनवरील विजेच्या खांबावर सिग्नल्स किंवा दिशा दाखवण्यासाठी आलेल्या होर्डिंग्ज व फलकांवर जाहिराती लावण्यात आल्या आहेत. या जाहिरातींना कसे परवाने दिले जातात असा प्रश्‍न खंडपीठाने उपस्थित केला.

केंद्र व राज्य सरकारचे या जाहिरातींबाबतचे धोरण याची माहिती खंडपीठासमोर सादर करावी.

फिरत्या वाहनांवर जाहिरात होर्डिंग्ज रस्त्याच्या सेटबॅक क्षेत्रात कसे उभे केले जातात असाही प्रश्‍न केला.

Panaji
Goa News Update: मडगाव गूढ मृत्यू, अपघात, लोकसभा राजकारण; गोव्यातील बातम्यांचा आढावा

रस्त्यांच्या विभाजकाच्या ठिकाणी असलेल्या विजेच्या खांबावर माहितीदर्शक फलकावर काही जाहिराती केल्या जातात हे खंडपीठानेही तोंडी यावेळी निदर्शनास आणून दिले.

या सुनावणीवेळी हस्तक्षेप अर्ज सादर करून मांडवी नदीमध्ये तरंगत्या कसिनोच्या जाहिरातींची रोषणाई करण्यात येत असल्याने त्याचा फटका किनारी भागातून जाणाऱ्या रस्त्यावरील वाहनांवर होत असल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणून देत तो कामकाजात घ्यावा अशी विनंती करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com