Modern Technology : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अध्यापनातही व्हावा ! संचालक भूषण सावईकर

Modern Technology : ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित पणजीत कार्यशाळा
Modern Technology
Modern Technology Dainik Gomantak
Published on
Updated on

Modern Technology :

पणजी, काळानुसार तंत्रज्ञानामध्ये अनेक बदल होत आहेत. या नव्या व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर संशोधन आणि अध्यापन प्रक्रियेत व्हायला हवा. नव्या शैक्षणिक धोरणातही उच्च शिक्षणातील अध्यापन प्रक्रियेत अधिकाधिक नव्या तंत्रज्ञानाच्या वापराबाबत सूचित करण्यात आलेले आहे.

असे प्रतिपादन उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक भूषण सावईकर यांनी केले.

‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापरही संशोधन आणि अध्यापनासाठी झाला पाहिजे. परंतु त्या अगोदर एआय तंत्रज्ञानाबाबतच्या शंका आणि प्रश्न यांचे देखील निरसन झाले पाहिजे, त्यासाठीच या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे,असेही सावईकर म्हणाले.

‘लिव्हरेजिंग जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर पिडॅगॉजिकल एक्सलन्स इन हायर एज्युकेशन’ या विषयावर येथील कला आणि संस्कृती संचालनालयाच्या सभागृहात आयोजित सहा दिवसीय कार्यशाळेत बोलत होते.

यावेळी मंचावर कार्यशाळेच्या मुख्य समन्वयक प्रा. कविता असनानी, मुख्य मार्गदर्शक डॉ. सुरेश नंबूथिरी, प्रो. नियॉन मार्शेन आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. कविता असनानी यांनी केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व माहितीपुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. प्रा. वंदना सावंत यांनी सूत्रसंचालन केले; तर प्रो. नियॉन मार्शेन यांनी आभार मानले.

Modern Technology
Goa Petrol Diesel Prices: गोव्यातील इंधनाच्या दरात किरकोळ बदल; जाणून घ्या पेट्रोल - डिझेलचे ताजे दर

२८० प्राध्यापकांचा सहभाग

१० जून ते १५ जून या दरम्यान चालणाऱ्या या सहा दिवसीय कार्यशाळेसाठी राज्यातील ३०५ प्राध्यापकांनी नोंदणी केलेली असून २८० प्राध्यापकांनी सहभाग घेतलेला आहे. यामध्ये विज्ञान शाखा-८२, वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखा- ५८, व्यावहारिक विज्ञान- ३३, आरोग्य विज्ञान- १७, सामाजिक विज्ञान-५०, तर कायदा आणि भाषा विभागातून ३९ शिक्षकांनी सहभाग घेतलेला आहे.

कार्यशाळेचे नियोजन

या कार्यशाळेचे मुख्य मार्गदर्शक डॉ. सुरेश नंबूथिरी असून त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘एआय’ तंत्रज्ञानासंदर्भात मार्गदर्शन केलेले आहे. या कार्यशाळेत १० जून रोजी विज्ञान शाखेतील प्राध्यापकांना, ११ रोजी वाणिज्य व व्यवस्थापन, १२ रोजी अप्लाइड सायन्स, १३ जून रोजी आरोग्य विज्ञान, १४ रोजी समाज विज्ञान, आणि १५ जून रोजी विधी, मानव्यशास्त्र व भाषा आदी विभागातील प्राध्यापकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com