Marathi Literary Conference : पणजीत मराठी साहित्य संमेलन : उद्या उद्‍घाटन

Marathi Literary Conference : बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे आयोजन, विविध कार्यक्रम
Marathi Literary Conference
Marathi Literary Conference Dainik Gomatnak

Marathi Literary Conference :

पणजी, दिल्ली येथील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे पाहिले मराठी साहित्य संमेलन इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा (आयएमबी)च्या सहयोगाने २४ व २५ फेब्रुवारी रोजी पणजीतील आयएमबी सभागृहात भरविण्यात येणार आहे.

या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ, निसर्गाचे अभ्यासक व लेखक किरण पुरंदरे यांची निवड झाली आहे. बृहन्महाराष्ट्र मंडळ दिल्लीचे प्रधान कार्यवाह दिलीप कुंभोजकर व सचिव दीपक कर्पे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत संमेलनाचा कार्यक्रम जाहीर केला. यावेळी यशवर्धन पाठक, विभागीय कार्यवाह चित्रा प्रकाश क्षीरसागर उपस्थित होत्या.

संमेलनाचे उद्घाटन २४ रोजी सकाळी १०.३० वाजता महाराष्ट्राचे मराठी भाषा व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे. केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत.

संमेलनात विशेष पाहुणे म्हणून माजी केंद्रीय कायदामंत्री ॲड. रमाकांत खलप, ज्येष्ठ साहित्यिक प्रशांत पोळ, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विद्या देवधर, त्याशिवाय दिवाकर शिंक्रे, इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझाचे अध्यक्ष दशरथ परब, बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष मिलिंद महाजन, प्रधान कार्यवाह दिलीप कुंभोजकर, विभागीय कार्यवाह चित्रा क्षीरसागर उपस्थित राहतील.

दुपारी १२.३० वाजता कथाकार जी. ए. कुलकर्णी यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान या विषयावर परिसंवाद होईल. या परिसंवादात डॉ. प्रमदा देसाई, प्रशांत पोळ आणि परेश प्रभू सहभागी होतील.

दुपारी २.३० वाजता पुस्तकाचे डिजिटल माध्यमावरून प्रचार व विपणन या विषयावर दृकश्राव्य प्रस्तुती काजल कामिरे करतील. यानंतर सांयकाळी ४ वाजता अलकनंदा साने यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन होईल.

संध्याकाळी ६.३० वाजता माझिया अंगणात सये हा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. प्रा. पौर्णिमा केरकर यांनी त्याचे लेखन केले असून जयेंद्रनाथ हळदणकर यांचे दिग्दर्शन आहे.

२५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३५ वाजता प्रसार माध्यमांचा मराठी भाषेवर परिणाम या विषयावर बनारस हिंदू विद्यापीठाचे मराठी विभागाचे प्रमुख डॉ. प्रमोद भगवान पडवळ यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होईल.

Marathi Literary Conference
Goa News : चंदेरी महोत्सव परवानगीला दिरंगाई; कुडचडे पालिकेची बेपर्वाई

यात भोपाळचे अजय बोकिल, गोव्यातील प्रा. कृष्णाजी कुलकर्णी व पत्रकार सागर जावडेकर, इंदूर येथील अरविंद जवळेकर, बेळगावचे गोपाल गावडा, काशीचे संतोष सोलापूरकर सहभागी होतील. या परिसंवादाचे सूत्रसंचालन राजश्री जोशी व सर्वोत्तम मासिकाचे संपादक आश्विन खरे करतील.

सकाळी ११.१५ वाजता साहित्यिक मुलाखत व गप्पांचा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किरण पुरंदरे असतील. यात साहित्यिक गजानन देसाई, महाकौशलचे प्रशांत पोळ, माळवा येथील विश्वनाथ शिरढोणकर, बेळगावचे डॉ. विनोद गायकवाड, तेलंगणाच्या डॉ. विद्या देवधर सहभागी होतील.

या सर्वांची मुलाखत बडोदा येथील संजय बच्छाव घेतील. दुपारी २.३० वाजता बोटीवरील निमंत्रितांचे कविसंमेलन होईल. गोव्यातील ज्येष्ठ साहित्यिक माधवराव सटवाणी अध्यक्षस्थानी असतील. सायंकाळी ६.३० वाजता संमेलनाचा समारोप होईल व त्यानंतर सामूहिक पसायदान पठण होईल.

गोमंतकीय साहित्यिकांचा सन्मान

या संमेलनात विद्या देवधर, डॉ. सोमनाथ कोमरपंत, प्रशांत पोळ, साहित्यिक दया मित्रगोत्री, अलकनंदा साने व पर्यावरण प्रेमी आणि प्रा. राजेंद्र केरकर यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. या सत्राचे सूत्रसंचालन सिद्धी उपाध्ये करणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com