Panaji
Panaji Dainik Gomantak

Panaji News : गटार व्यवस्थेबाबत मॅपिंग समिती यापूर्वीच का नाही; नगरसेवकांचा आरोप

Panaji News : शहरातील गटार व्यवस्थेचे मॅपिंग करण्यासाठी धोरण तयार करणार आयपीएससीडीएलने नेमलेली समिती करणार आहे.

Panaji News :

पणजी, इमेजिन पणजी स्‍मार्ट सिटी विकास लिमिटेडने (आयपीएससीडीएल) शहरातील गटार व्यवस्थेच्या मॅपिंगसाठी नेमलेल्या तज्ज्ञांची सल्लागार समितीवर आता माजी महापौर तथा आजी नगरसेवक उदय मडकईकर आणि माजी नगरसेवक रूपेश हळर्णकर यांनी आक्षेप नोंदविला आहे. ही समिती पणजीतील स्मार्ट सिटीची कामे सुरू असतानाच का तयार करण्यात आली नाही, असा सवाल त्यांनी केला आहे.

शहरातील गटार व्यवस्थेचे मॅपिंग करण्यासाठी धोरण तयार करणार आयपीएससीडीएलने नेमलेली समिती करणार आहे. जर गटार व्यवस्थापनाचे धोरण तयार करायचेच होते, तर आयपीएससीडीएलचे सीईओपद स्वीकारताच संजीत रॉड्रिग्स यांनी ते लक्षात घ्यायला हवे होते, असे मडईकर यांनी ‘गोमन्तक''ला सांगितले.

ते म्हणाले, महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून संजीत यांनी सर्वाधिक काळ काम केले आहे, त्यांना पणजीतील गटारव्यवस्थेची कल्पना आहे, त्यामुळे आयपीएससीडीएलवर नियुक्त होताच हे धोरण तयार करण्यासाठी पावले उचलायला हवी होती.

या समितीचे अध्यक्षपद आयपीएससीडीएलचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीत रॉड्रिग्स सांभाळणार आहेत.

समितीमध्ये पणजी महानगरपालिका, भू सर्व्हेक्षण व सेंटमेंट खाते, उत्तर गोवा नगर नियोजन प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता, जलस्रोत खाते, चार्ल्स कुरय्या फाऊंडेशन आणि पणजीच्या नागरिक पेट्राशिया पिंटो यांचा समावेश आहे. या समितीवर शहरातील सर्व गटारांचे मॅपिंग करण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्याची जबाबदारीअसणार आहे.

Panaji
Goa Congress: काँग्रेसच्या गोव्यातील उमेदवारांवर शिक्कामोर्तब होणार? दिल्लीत खलबते

उशिरा गटार व्यवस्थापन

पणजी आणि रायबंदर परिसरातील गटार व्यवस्थेत यापूर्वी दोष आढळून आले आहेत. आपण नगरसेवक असताना गटार व्यवस्थापनाचा विषय वारंवार बैठकीत मांडला होता, परंतु तो विषय गांभीर्याने कधी महानगरपालिकेने घेतलाच नाही.

एवढ्या उशिरा गटार व्यवस्थापनाविषयी आयपीएससीडीएलने पाऊल उचलल्याचे आश्‍चर्यच वाटत आहे. अनेक ठिकाणी नव्याने गटारांचे काम झालेले आहे. हे काम कशापद्धतीने झाले आहे, हे कोण तपासणार? गटारातील भूपृष्टाची पातळी खाली-वर झाली असली तर कोणाला दोष देणार असाही प्रश्‍न आहे, असे माजी नगरसेवक हळर्णकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com