Smart City : ‘स्‍मार्ट सिटी’ घोळाची चौकशी करा! विजय सरदेसाई

Smart City : सरदेसाई यांचे पंतप्रधान कार्यालयाला पत्र, १२०० कोटी रुपये पाण्‍यात
Vijai Sardesai
Vijai Sardesai Dainik Gomantak

Smart City :

मडगाव, स्‍मार्ट सिटीच्‍या कामाबाबत उच्‍च न्‍यायालयाला दिलेले आश्‍वासन पूर्ण करण्‍यात पणजी महापालिकेला अपयश आले असतानाच आता या कामात १२०० कोटींचा घोटाळा झाल्‍याचा आराेप गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी केला आहे.

या गैरव्‍यवहाराची सखोल चौकशी करण्‍याची मागणी सरदेसाई यांनी पंतप्रधान कार्यालयाला पत्राद्वारे केली आहे.

भाजप कार्यालयाजवळ रस्त्याला भगदाड

पणजीत जिथे भाजपचे कार्यालय आहे तिथेच रस्‍त्‍याला भगदाडे पडली आहेत. गटार व्‍यवस्‍थाही व्‍यवस्थित नाही. फोडलेल्‍या रस्‍त्‍यांमुळे गेली अनेक वर्षे पणजीवासीयांचे हाल होत असून या खड्ड्यात पडून काहीजणांचे जीवही गेले आहेत.

Vijai Sardesai
South Goa: दक्षिणेत ख्रिश्चन पाद्रींमुळेच पल्लवी धेंपेंचा पराभव, भाजप नेत्यांचा दावा; विरोधात मतदानाचा होता आरोप

हे काम मार्गी लावताना मोठा भ्रष्‍टाचार झाला असून हे काम अत्‍यंत तकलादू असल्‍याने भविष्‍यात त्‍यामुळे अपघात घडू शकतात. त्‍यामुळे या कामाचे संपूर्ण ऑडिट करावे आणि हे काम व्‍यवस्थित होईल याची खात्री करावी, अशी मागणी सरदेसाई यांनी या पत्राद्वारे केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com