Dam Water : धरणांत पाणी पातळी घटली; सरासरी २ मीटरने जलसाठ्यात घट

Dam Water : सध्या तिळारी धरणामधील पाण्याच्या पातळीची उंची ६ मीटर कमी झाली असली तरी सध्या ८८.३० मीटर पाणी आहे तर पंचवाडी धरणात सर्वात कमी म्हणजे १८.९६ मीटर इतका पाणीसाठा आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत या जलसाठ्यात पुरेसे पाणी असल्याने पाणीटंचाईची शक्यता नाही, अशी माहिती जलस्रोत खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
 Dam Water Level Decrease
Dam Water Level DecreaseDainik Gomantak

Dam Water :

पणजी, राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली असली त्याचा परिणाम धरणांमधील जलसाठ्यावर झालेला नाही. गेल्या तीन आठवड्यात या धरणांमधील पाण्याची पातळीची उंची सरासरी दोन मीटर घटली आहे. येत्या जूनअखेरपर्यंत पाणीपुरवठा पुरेल इतका जलसाठा राज्यातील ७ धरणांमध्ये आहे. परिणामी पाणीटंचाईची शक्यता तूर्त तरी जाणवणार नाही.

सध्या तिळारी धरणामधील पाण्याच्या पातळीची उंची ६ मीटर कमी झाली असली तरी सध्या ८८.३० मीटर पाणी आहे तर पंचवाडी धरणात सर्वात कमी म्हणजे १८.९६ मीटर इतका पाणीसाठा आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत या जलसाठ्यात पुरेसे पाणी असल्याने पाणीटंचाईची शक्यता नाही, अशी माहिती जलस्रोत खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

राज्यातील या सातही धरणांपैकी पंचवाडी वगळता इतर धरणांतील पाणी पातळीत घट झाली आहे.

जलस्रोत खात्याने आज धरणांमधील जलसाठ्याच्या पाण्याच्या पातळीची उंची मोजली आहे. गेल्या ३० एप्रिलला मोजलेल्या उंचीपेक्षा ही पातळी कमी झाली आहे. तिळारीमध्ये सध्या पाण्याच्या पातळीची उंची ८८.३० मीटर असून १४,७२७ हेक्टर मीटर पाणी आहे. त्यामुळे बार्देश तालुक्यासाठी या धरणातून होणारा पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकतो.

 Dam Water Level Decrease
Goa Police: गस्त वाढवा, संशयास्पद व्यक्तींची धरपकड करा! वाढत्या चोरींच्या पार्श्वभूमीवर गोवा डिजीपींच्या पोलिसांना सूचना

साळावली धरणातील पाण्याची पातळीची उंची १.५ मीटरने घटली असली तरी ६८९२ हेक्टर मीटर पाणी आहे. अंजुणे धरणाची धारण क्षमता ९३.२० मीटर असून सध्या त्यामध्ये ७८८ हेक्टर मीटर पाणी आहे. मात्र पातळी ३ मीटरने कमी होऊन ७४.१३ मीटरवर जलसाठा आहे. आमठाणे तील जलसाठाही कमी झाला आहे.

गेल्या तीन आठवड्यात पाणी पातळी ३.८० मीटरने वाढली असून ४७.६९ मीटरवर जलसाठा आहे. चापोलीमधील पाणी पातळी एक मीटरने घटली असून ५३२ हेक्टर मीटर पाणी आहे. गावणे धरणातील पाणी पातळी ०.६६ मीटरने कमी झाली आहे. राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा या धरणातील जलसाठ्यात फारसा फरक झालेला नाही.

गळतीमुळे पुरवठ्यावर परिणाम

राज्यातील धरणांमध्ये जून महिन्यांपर्यंत पुरेल एवढा पुरेसा जलसाठा असल्याचा दावा जलस्रोत खात्याने केला आहे. धरणांत पाणी आहे, मात्र जीर्ण जलवाहिन्या वारंवार फुटत असून ती दुरुस्त होईपर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. निर्जन भागातून गेलेल्या वाहिन्या फुटल्यास कोणी निदर्शनास आणून दिल्याशिवाय त्याची माहिती मिळत नाही, परिणामी पाणी वाया जाते.

त्यामुळे जुन्या मोठ्या जलवाहिन्या बदलणे गरजेचे आहे. गेल्या आठवड्यात फोंडावासीयांनी सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने आंदोलन करून मोर्चाचा इशाराही दिला होता. पेडणे भागातही पाणीटंचाई आहे. कमी दाबाने पाणी येते व पुरेसे पाणी न मिळाल्याने लोकांचा रोष वाढत आहे. जीर्ण वाहिन्या तातडीने बदलणे हाच सुरळीत पाणीपुरवठ्यावरील उपाय आहे, असे मत सार्वजनिक बांधकाम खात्यातील एका अधिकाऱ्याने व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com