Environmental Awareness : पर्यावरण जागृतीसाठी विद्यार्थ्यांना मिळणार आर्थिक मदत 

Environmental Awareness : खात्यातर्फे अधिसूचना जारी : क्लब, शैक्षणिक संस्थांना होणार लाभ
Environmental Awareness
Environmental AwarenessDainik Gomantak

Environmental Awareness :

पणजी, पर्यावरण जागृतीसाठी देशपातळीवर विविध योजना राबविल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गोवा पर्यावरण खात्याने स्वयंसेवी संस्था, नोंदणीकृत क्लब, शैक्षणिक संस्था, संशोधकांना पर्यावरण जागृती कार्यक्रमांसाठी आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात अधिसूचनाही काढण्यात आली आहे. पर्यावरण आणि हवामान बदलाशी संबंधित समस्यांचे संवर्धन करण्यासाठी ही योजना असेल. याचा लाभ माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालयांनाही होणार आहे. कार्यशाळा, प्रदर्शने, परिसंवाद, पुस्तकांचे प्रकाशन असे विविध उपक्रम राबविण्यास याद्वारे प्रोत्साहन मिळणार आहे.

४० हजारांपासून २ लाखापर्यंत साहाय्य

पर्यावरण जागृती करणाऱ्या शिक्षकांना, संशोधकांना आणि तज्ज्ञांना आर्थिक साहाय्य देणे तसेच भारत किंवा विदेशातील कार्यशाळेत सहभागी होता यावे, यासाठी पर्यावरण विभागातर्फे ४० हजारांपासून २ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जात आहे. ही योजना गेल्यावर्षी लागू झाली असून, ती पाच वर्षांच्या कालावधीसाठी वैध राहील. या योजनेचा लाभ हा जास्तीत जास्त १० माध्यमिक आणि १० उच्च माध्यमिक शाळा, १० महाविद्यालये/संशोधन संस्था/एनजीओ, व्हीजीओ, नोंदणीकृत क्लब यांना होणार आहे.

Environmental Awareness
Goa Petrol Diesel Prices: गोव्यातील पेट्रोल - डिझेलच्या दरात बदल, जाणून घ्या ताजे भाव

अशी होणार निवड :

पर्यावरणावर नमूद केलेले उपक्रम आयोजित करण्यासाठीचे प्रस्ताव शिक्षण संचालनालय उच्च शिक्षण/गोवा विद्यापीठाकडे पाठवणे आवश्यक असतील. पर्यावरण आणि हवामान बदल विभागाशी सल्लामसलत करून प्रकल्प पुर्नरावलोकन समितीने मान्य केल्यानंतर प्रत्येक गट/संस्था अनुदानास पात्र ठरणार आहे. सेमिनार/कार्यशाळेत सहभागी होण्यासाठीचे अनुदान केवळ प्रवास खर्च, मुक्काम आणि नोंदणी शुल्कापुरते मर्यादित असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com