Panaji News : मानवी हस्तक्षेपामुळे वन्यजीवांच्या जीवनात व्यत्यय: उमेश कुमार रुस्तगी

Panaji News : ‘सायन्स फिएस्टा’चे उद्‌घाटन, संचालक लेविन्सन मार्टिन्स म्हणाले, राज्यातील दोन्ही जिल्ह्यांमध्ये कचरा व्यवस्थापन प्रकल्प आहेत, त्यांना विद्यार्थ्यांनी भेट देऊन त्याबाबत जाणून घेणे गरजेचे आहे.
Panaji
PanajiDainik Gomantak
Published on
Updated on

Panaji News :

पणजी, दिवसेंदिवस जंगल क्षेत्रफळात घट होत आहे, त्यामुळे वन्यजीवांच्या क्षेत्रात आम्ही प्रवेश करत आहोत.

त्यामुळे मानव-वन्यजीवांच्या जीवनात व्यत्यय आणत असून त्याचे भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागतील,असे प्रतिपादन नेहरू विज्ञान केंद्र मुंबईचे संचालक उमेश कुमार रुस्तगी यांनी केले.

ते गोवा विज्ञान केंद्र आणि गोवा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाद्वारे आयोजित ‘सायन्स फिएस्टा’ महोत्सवाच्या उद्‍घाटनावेळी बोलत होते.यावेळी गोवा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे संचालक लेविन्सन मार्टिन्स, गोवा विज्ञान केंद्राचे संचालक, प्रकल्प संयोजक विलास चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

Panaji
Goa Petrol-Diesel Price: आठवड्याच्या सुरुवातीला असे आहेत गोव्यातील इंधनाचे दर; वाचा पेट्रोल-डिझेलच्या किमती

संचालक लेविन्सन मार्टिन्स म्हणाले, राज्यातील दोन्ही जिल्ह्यांमध्ये कचरा व्यवस्थापन प्रकल्प आहेत, त्यांना विद्यार्थ्यांनी भेट देऊन त्याबाबत जाणून घेणे गरजेचे आहे.

या टाकावू वस्तुपासून पुनर्निमिती कशी करता येईल याबाबत जाणून घेणे ही काळाची गरज असून विज्ञान क्षेत्रातील राज्यात असणाऱ्या एनआयओ, एनआयटी आदी संस्थाना भेट देत विज्ञानासंबंधी जाणणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

‘सायन्स फिएस्टा - २०२४’ या नावाने तीन दिवसीय विज्ञानावर आधारित ‘मेगा इव्हेंट’ सोमवार २६,पासून मिरामार येथे सायन्स सेंटर येथे सुरू असून तो २८ पर्यंत चालणार आहे. या तीन दिवसांत विद्यार्थी आणि सर्वसामान्यांना शास्त्रज्ञ, संशोधन अभ्यासक यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळेल.

मेगा इव्हेंटमध्ये रोबोटिक्ससह विविध गोष्टी

‘मेगा इव्हेंट’मध्ये लिक्विड नायट्रोजन शो, रोबोटिक्सचे प्रात्यक्षिक अशा अनेक गोष्टी यात असतील.

त्यासोबतच ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञासोबत संवादात्मक सत्र होईल, चित्रकला स्पर्धा, कार्यशाळा आशा वेगवेगळ्या उपक्रमांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या महोत्सवाला मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी हजेरी लावावी, असे आवाहन आयोजकांद्वारे करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com