Panaji News : आयुर्वेद, निरोगी पर्यटनाला चालना देणार : सुनील अंचिपाका

Panaji News : धारगळ येथील अ. भा. आयुर्वेद संस्थेत योगदिन
Panaji
Panaji Dainik Gomantak
Published on
Updated on

Panaji News :

पणजी, संतुलित आणि निरोगी जीवनशैली साधण्यासाठी योग आणि आयुर्वेदाचा आपल्या दैनंदिन जीवनात समावेश करणे आवश्यक आहे.

आरोग्य आणि आनंदासाठी सर्वांगीण दृष्टिकोन वाढवून, वेलनेस टुरिझमला एकत्रित करण्यासाठी गोवा एक परिपूर्ण गंतव्यस्थान आहे.

Panaji
Mumbai Goa Highway:...अन् भीती खरी ठरली, पेडण्यात NH66 वर संरक्षक भिंत कोसळली, कुटुंब थोडक्यात बचावले

पर्यटन खाते ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदाचा समावेश करून संपूर्ण देशात तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आयुर्वेद आणि निरोगी पर्यटनाला चालना देईल, असे पर्यटन खात्याचे संचालक सुनील अंचिपाका(आयएएस) यांनी सांगितले.

धारगळ येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी सुनील अंचिपाका बोलत होते. यावेळी ज्योती सरदेसाई, डीन प्रा. डॉ. सुजाता कदम आदी उपस्थित होते.

दीप प्रज्वलन, धन्वंतरी पूजन, स्तवन, पतंजली स्तवन या पारंपारिक विधींनी कार्यक्रमाची सुरुवात झाली. डायनॅमिक योगा फ्यूजनसह विविध सत्रे यावेळी झाली. डॉ. योगेश शिंदे यांनी मार्गर्शन केले. यावेळी योग तिकिटांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच रांगोळी, योगासन आणि ई-स्लोगन स्पर्धांचे बक्षिस वितरण झाले.

'वेलनेस टुरिझम'वर भर ः

डीन प्रा. डॉ. सुजाता कदम यांनी गोव्यातील सर्वांगीण प्रगती आणि 'वेलनेस टुरिझम'ला चालना देण्यावर भर दिला. सर्वांगीण आरोग्य प्राप्त करण्यासाठी योगाची आवश्‍यकता आहे.

शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक सौहार्दासाठी आवश्यक प्राचीन पद्धतींचा प्रचार करण्यावर लक्ष केंद्रित आहे. गोव्याला निरोगी व अधिक संतुलित जीवनशैली स्वीकारण्यासाठी प्रेरणा देणारे वेलनेस टुरिझमसाठी एक अग्रगण्य स्थान बनवण्याचे उद्दिष्ट आहे, असे त्या म्हणाल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com