Margao Municipality : ‘ऑनलाईन पेमेंट’मध्ये मडगाव पालिका अव्वल

Margao Municipality : पणजी दुसऱ्या स्थानी : जन्म-मृत्यू दाखला, घरपट्टी आदी सुविधांचा समावेश
Online Payment
Online Payment Dainik Gomantak

Margao Municipality : मडगाव, राज्यातील १३ नगरपालिका आणि एका महानगरपालिकेतर्फे विविध सेवा ऑनलाईन पद्धतीने दिल्या जातात. मडगाव पालिका क्षेत्रातील नागरिकांनी या ऑनलाईन सेवेचा सर्वाधिक लाभ घेतला आहे.

नगर विकास खात्यातर्फे मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत २८ हजार ७२ सेवा ऑनलाईन पद्धतीने दिल्या आहेत. यांतील ३३.२३ टक्के म्हणजेच ९ हजार ३२५ ऑनलाईन पेमेंट मडगाव पालिका क्षेत्रात झाली आहेत.

ऑनलाईन सेवांमध्ये जन्म आणि मृत्यू दाखला मिळवणे, घरपट्टी भरणे आणि व्यापार परवाना घेणे या सुविधांचा समावेश आहे. या क्रमवारीत पणजी महानगरपालिका दुसऱ्या स्थानी आहे. येथे ६ हजार २८६ ऑनलाईन पेमेंट करण्यात आली आहेत.

यानंतर मुरगाव पालिकेत ६ हजार १९४, फोंडा पालिकेत २ हजार २८५, म्हापसा पालिकेत २ हजार २५९, तर डिचोली पालिकेत ४२३ ऑनलाईन पेमेंट करण्यात आली आहेत.

सर्वांत कमी २८ ऑनलाईन पेमेंट सांगे पालिकेत झाली आहेत. यानंतर पेडणे (४७), वाळपई (७०), साखळी (१६८), केपे (१७६), कुडचडे-काकोडा (२६३), काणकोण (२५०), कुंकळ्ळी (२९०) या नगरपालिकांचा क्रमांक लागतो.

Online Payment
IFFI 2023 Goa: ‘इफ्फी’च्या अधिकृत विभागात गोव्यातील 7 चित्रपट असतील हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे- पणजीकर

ऑनलाईन पद्धतीने जन्म दाखले देण्यातदेखील मडगाव पालिका अव्वल आहे. येथे ३३ हजार ४३३ जन्म दाखले ऑनलाईन पद्धतीने देण्यात आले आहेत. यानंतर म्हापसा पालिका (१३,४८७) आणि पणजी महापालिका (१२,३३५) यांचा क्रमांक लागतो.

म्हापसा पालिका क्षेत्रात सर्वाधिक २२ हजार ४३१ घरपट्टीची रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरण्यात आली आहे. यानंतर पणजी (१,९८१), मडगाव (१,७३०), मुरगाव (१,६९८) या पालिकांचा क्रमांक लागतो. व्यापार परवाने ऑनलाईन पद्धतीने देण्यात पणजी महापालिका अव्वल आहे.

येथे ५३४ व्यापार परवाने देण्यात आले आहेत. मडगावमध्ये ३५१, म्हापसामध्ये २१२, मुरगावमध्ये २३४ व फोंडा पालिकेतर्फे १४५ व्यापार परवाने देण्यात आले आहेत.

१४ कोटींचा ऑनलाईन महसूल

आतापर्यंत विविध पलिकांतर्फे एकूण १ हजार ८६३ व्यापार परवाने, ३१ हजार ४०५ घरपट्टी, १ लाख ५ हजार ८३ जन्म दाखले व ५ हजार ४३७ मृत्यू दाखले ऑनलाईन पद्धतीने देण्यात आले आहेत. याचे मूल्य १३ कोटी ८१ लाख १५ हजार ४९९ रुपये आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com