वेंगुर्लेतील खाडीत बुडालेल्या दोन तरुणांपैकी एकाला वाचवण्यात यश; शोधकार्य सुरु

वेंगुर्ले-मांडवी खाडीमध्ये पोहण्यासाठी उतरलेले दोघेजण बुडाले. त्यातील एकाला वाचविण्यात यश आले, तर दुसरा समुद्रात बेपत्ता झाला.
One of two youths who drowned in a creek at Vengurle has been rescued Rescue operation is in progress
One of two youths who drowned in a creek at Vengurle has been rescued Rescue operation is in progress Dainik Gomantak
Published on
Updated on

वेंगुर्ले-मांडवी खाडीमध्ये पोहण्यासाठी उतरलेले दोघेजण बुडाले. त्यातील एकाला वाचविण्यात यश आले, तर दुसरा समुद्रात बेपत्ता झाला. यश भरत देऊलकर (वय १६, रा. गोवा, मूळ रा. मोरगाव) असे बेपत्ता झालेल्याचे नाव आहे. उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता. ही घटना काल दुपारी दोनच्या दरम्यान घडली. गौरव देवेंद्र राऊळ (वय १५) याला वाचविण्यात यश आले.

यश हा शुक्रवारी (ता. १०) तळवडा-परबबाडी (ता. सावंतवाडी) येथे आपल्या मामाकडे आला होता. आज आपल्या चुलत मावशी व कुटुंबीयांसोबत वेंगुर्ले येथे फिरण्यासाठी गेला होता. येथील झुलत्या पुलानजीक असलेल्या पाण्यात पोहण्याचा मोह त्यांना आरवला नाही. त्यामुळे हे दोघे युवक पोहण्यासाठी पाण्यात उतरले; मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले.

त्याठिकाणी असलेल्या दाजी बटवलकर या मच्छीमार बांधवाने गौरव याला वाचविले; मात्र यश हा पाण्याच्या प्रवाहात बुडाला. सायंकाळी उशिरापर्यंत खाडीपात्रात त्याचा शोध सुरू होता. याबाबत यश याची चुलत मावशी दीक्षा राऊळ यांनी वेंगुर्ले पोलिसांत (Police) खबर दिली.

One of two youths who drowned in a creek at Vengurle has been rescued Rescue operation is in progress
Goa Crime News: नेरुळ येथे बनावट कॉल सेंटर चालवणाऱ्यांचा पर्दाफाश; पोलिसांकडून तिघांना अटक

खाडी किनारी पर्यटकांसहित स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत जाधव, पोलिस हवालदार योगेश वेंगुर्लेकर, पांडुरंग खडपकर, एस. आर. कुबल, पोलिसमित्र निकेश नांदोस्कर यांनी खाडीत बोटीतून जाऊन शोधकार्य केले.

नगरपालिका मुख्याधिकारी पारितोषिक कंकाळ यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. यावेळी वेंगुर्ले-दाभोसवाडा येथील जीवरक्षक दत्तप्रसाद नांदोस्कर, मनोज कुबल, दादा कुबल यांच्यासह स्कुबा डायव्हिंगची ट्रेनिंग घेतलेले मंदार टांककर, साहिल मसूरकर, सचिन मोरजे यांनी सायंकाळपर्यंत शोधकार्य केले; मात्र उशिरापर्यंत यश याचा शोध लागला नव्हता.

One of two youths who drowned in a creek at Vengurle has been rescued Rescue operation is in progress
Goa Crime News: पेडण्यात टॅक्सीचालकांनी आणले कोनाडकरांचे खून प्रकरण उघडकीस

सध्या उन्हाळ्याची सुटी असून, अनेक पर्यटक झुलत्या पुलाला भेट देत असतात. याठिकाणी ब्रेक वॉटर बंधाऱ्याचे तसेच मच्छीमार जेटीचे काम सुरू आहे. पर्यटकांच्या (Tourists) सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनामार्फत सुरक्षारक्षक व मार्गदर्शक फलक असणे आवश्यक आहे. याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ व पर्यटकांतून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com