Fisherman Death: पोहता येत नव्हते, रात्री मासेमारीसाठी गेला अन्...; फर्नांडिस कुटुंबांवर कोसळला दु:खाचा डोंगर

मृत व्यक्तीला पोहायला येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे.
Fisherman Death
Fisherman DeathDainik Gomantak
Published on
Updated on

Fisherman Death: सध्या राज्यात व्यावसायिक मासेमारी बंद आहे. यादरम्यान, गोड्या पाण्यातील मासेमारीकडे लोकांचा कल वाढला असून जागोजागी मत्स्यप्रेमी गळ किंवा जाळे टाकून मासे पकडताना दिसत आहेत. अशातच एक दुर्दैवी घटना घडली आहे. मेळा बाणावलीत मासे पकडताना एकाचा मृत्यू झाला आहे.

Fisherman Death
Hindu Convention at Ponda : देशातील एक हजार मंदिरात वस्त्रसंहिता ते हिंदू राष्ट्राची घोषणा; गोव्यातील हिंदू अधिवेशनातील 7 ठराव

मेळा बाणावली येथील एका तळ्याजवळ जाळीने मासेमारी करीत असताना तोल जाऊन तळ्यात पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

व्हिन्सेंट आंतोनियो फर्नांडिस (43, रा. वार्का) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते 21 जूनच्या रात्री 12.30 ते 2.30 दरम्यान नदीकिनारी जाळीने मासेमारी करीत होते, त्यावेळी त्यांचा तोल गेल्याने ते थेट नदीत पडले. माहितीनुसार, मृत व्यक्तीला पोहायला येत नसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर कोलवा पोलिसांनी पंचनामा केला आणि मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com