Olive Ridley: गोव्यात कासवांना अच्छे दिन! ‘ऑलिव्ह रिडलेंची' संख्या दुप्पट

Olive Ridley Turtle Conservation: ऑलिव्ह रिडले कासवांनी गोव्याच्या विविध समुद्रकिनाऱ्यांवर ४५,४९३ अंडी घातली असून यापूर्वीचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत
Olive Ridley Turtle conservation: ऑलिव्ह रिडले कासवांनी गोव्याच्या विविध समुद्रकिनाऱ्यांवर ४५,४९३ अंडी घातली असून यापूर्वीचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत
Olive Ridley dainikgomantak
Published on
Updated on

Goa Olive Ridley Turtles

म्हापसा : राज्यातील समुद्रकिनारे हे कासव संवर्धनासाठी प्रसिद्ध आहेत. यंदाच्या हंगामात ऑलिव्ह रिडले कासवांनी गोव्याच्या विविध समुद्रकिनाऱ्यांवर ४५,४९३ अंडी घातली असून यापूर्वीचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. २०२३ मध्ये घरटी हंगामात सुमारे १६,३१२ अंडी मिळाली होती. यंदा ही संख्या दुपटीने वाढली आहे.

अंडी घालण्याचे प्रमाण वाढणे आणि पिल्ले पुन्हा समुद्रात सोडणे हा राज्याच्या वन विभागाच्या प्रामाणिक प्रयत्नांचा पुरावा आहे, असे अतिरिक्त मुख्य वनरक्षक आणि मुख्य वन्यजीव रक्षक उमाकांत यांनी सांगितले. वाढता आकडा ही चांगली बाब असून लोकांकडून वन विभागाच्या कार्याची स्तुती होत आहे. यासाठी वन विभागाचे श्रेय आहे, तितकेच स्थानिकांचे सुद्धा. कारण लोकांच्या सहकार्यानेच ही शक्य झाले आहे. वाढत्या जनजागृतीमुळे स्थानिक, पंचायत, पर्यटक, शॅकवाले यांच्याकडून चांगले सहकार्य मिळत आहे, यावर त्यांनी जोर दिला.

येथील समुद्रकिनारे (Beaches) हे कासवांसाठी अंडी घालण्यासाठी नैसर्गिक क्षेत्र आहे. कासवांची स्मरणशक्ती ही दीर्घ असते. ते किमान वीस ते तीस वर्षांपूर्वी गोव्याच्या किनाऱ्यावर आले असावे, त्यानंतर पुन्हा आपल्या आठवणींना उजाळा देत ते किनाऱ्यांवर परतले. ही गोष्ट गोव्यासाठी शुभ संकेत आहे. यामुळे वनविभाग देखील खूष असल्याचे उमाकांत यांनी नमूद केले.

अंडी उबण्यासाठी तयार होण्यापूर्वी ४५ दिवसांच्या चक्रातून जातात. घरट्यांची विक्रमी संख्या असूनही आव्हाने कायम आहेत. कारण सर्व अंडी उबत नाहीत. गोवा वन विभागाच्या वन्यजीव अधिकाऱ्यांनी संकलित केलेल्या कासवांच्या घरट्यांच्या अहवालातील आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, उत्तर गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर एकूण २१६ घरटी (नेस्ट) आहेत.

यामध्ये २२,५२८ अंडी होती, ज्यातून १५,१४६ अंडी यशस्वीरीत्या समुद्रात पोचली. दक्षिण गोव्यात २३१ घरट्यांनी २२,९६५ अंड्यांचे योगदान दिले ज्यातून १३,५५३ अंडी सोडण्यात आली. गेल्या २०-३० वर्षांमध्ये, कासव संवर्धनाच्या प्रयत्नांमुळे गोव्यात घरटी बांधण्यात लक्षणीय वाढ झाली आहे.

सागरी संरक्षक यांनी सांगितले की, नैसर्गिक व मानववंशजन्य घटकांचे मिश्रण असलेल्या अनेक कारणांमुळे ठराविक प्रमाणात अंडी परिपक्वता आणि उबण्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. अशावेळी हॅचरी तयार करणे आणि घरटे स्थलांतरित करण्याच्या सर्वोत्तम जागतिक पद्धतींचे पालन करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

डेटा उपलब्धतेनुसार, आगोंदा किनाऱ्यावर १८१ घरटे आणि तिथे १८,०११ अंडी घालण्यात आली. त्यातील ९,६६१ पिल्लांना समुद्रात सोडले. त्यानंतर, मोरजी किनाऱ्यावर ११,१३० अंडी देणारी १०५ घरटी होती, ज्यातून ७,७६७ अंडी त्यांच्या नवीन जीवनात पोहली.

वन कर्मचाऱ्यांकडून आवश्‍यक खबरदारी

काही किनाऱ्यांवरील ध्वनी प्रदूषणाचा मारा वाढला आहे. अशावेळी कासवांच्या अंडी घालण्यात अडचणी येतात का? असे विचारले असता अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुळात सीआरझेड हा परिसर वनविभागाच्या अधिकारक्षेत्रात येत नसतो. जिथे-जिथे नेस्ट आहेत, तिथे आमचे कर्मचारी तैनात असतात. तसेच गरजेनुसार जनजागृती व लोकांमध्ये स्थितीची संवेदनशीलता समजावली जाते. त्यामुळे आवश्यक खबरदारी घेऊन, अंड्याचे संवर्धन होणार याची पुरेपूर खात्री घेतली जाते. त्यामुळे यंदाच्या हंगामात ऑलिव्ह रिडलेची यंदाच्या हंगामात ४५ हजारांहून अधिक अंडी घातल्या आहेत. तसेच किनाऱ्यांवरील लखलखणारे दिवे नेस्टींग स्थळी पडणार नाही याची खबरदारी सुद्धा वनविभागाचे कामगार घेतात.

Olive Ridley Turtle conservation: ऑलिव्ह रिडले कासवांनी गोव्याच्या विविध समुद्रकिनाऱ्यांवर ४५,४९३ अंडी घातली असून यापूर्वीचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत
Olive Ridley Turtles Goa: आगोंद-गालजीबागमध्ये ऑलिव्ह रिडले यंदा विक्रमी संख्येने

२०२४ मध्ये ऑलिव्ह रिडले कासवांनी कुठल्या समुद्रकिनाऱ्यावर किती अंडी घातल्या व पिल्ल्लांना समुद्रात सोडले

आगोंद ............... १८,०११ \ ९,६६१

गालजीबाग ............४,३६९ \ ३,४६३

मोरजी .................११,१३० \ ७,७६७

मांद्रे येथे ...............३,५४५ \ २,८५७

हरमल .................१,२७७ \ ८६३

बागा .................. ४५५ \ ३३४

कळंगुट ............... १४२९ \ ७२४

कांदोळी .............. ९९७ \ ५७६

केरी ................... १,२५० \ ८३७

वागातोर ...............१,८६८ \ १,०६१

मिरामार ............... ९० \ ८५

दक्षिण गोव्यात ........ ५८५ \ ४२९

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com