Goa Murder Case: मालमत्तेच्या वादातून गब्बरचा खून; मिर्झापूर येथील पाचजणांना अटक

जुने गोवे पोलिसांची कारवाई
Old Goa Police Arrested Acused
Old Goa Police Arrested Acused Dainik Gomantak
Published on
Updated on

Old Goa Police Arrested Acused In Carambolim Murder Case: गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या चंद्ररिका ऊर्फ गब्बर साहनी (उत्तरप्रदेश) याच्या खूनप्रकरणी जुने गोवे पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी पाचजणांच्या मुसक्या आवळल्या.

उत्तरप्रदेशमधील जमिनीच्या मालमत्तेवरून मयत व संशतियांमध्ये वाद होता. त्यामुळे संशयितांनी चंद्ररिका याला पर्वरी येथे बोलावून त्याचा खून केला व मृतदेहाचे हातपाय बांधून तो दांडो - करमळी येथील मानशीमध्ये फेकून देत पुरावा नष्ट केला होता.

संशयितांनी खुनाची कबुली दिली असून त्यांना पोलिस कोठडी घेण्यात येणार आहे. जुने गोवे पोलिसांनी मृतदेह सापडल्यापासून चोवीस तासांत त्याची ओळख पटवून संशयितांना गजाआड केले.

अटक केलेल्या संशयितांची नावे राजेंद्र रामरतन प्रसाद (34), रणजीत रामरतन प्रसाद (३२), राजकुमार रामरतन प्रसाद (४६), अखिलेश कुमार साहनी (३०) व रामरतन प्रसाद (७७) यांचा समावेश आहे. हे सर्वजण मूळचे मिर्झापूर - उत्तरप्रदेश येथील असून सध्या आल्त पर्वरी येथील एसबीआय कॉलनीमध्ये रहात होते.

मयत चंद्ररिका ऊर्फ गब्बर साहनी व संशयित हे दोघेही मिर्झापूर - उत्तरप्रदेश येथील आहेत. उत्तरप्रदेशात त्यांच्यात जमिनीच्या वादावरून वैमनस्य होते.

Old Goa Police Arrested Acused
Teacher Molesting Student: शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग; मडकईतील प्रकार

संशयितांनी केलेल्या मारहाणीत चंद्ररिका याचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी गाडीने तो मृतदेह दांडो - करमळी येथील मानशीच्या ठिकाणी नेण्यात आला.

तेथे मृतदेहाचे हातपाय दोरीने बांधण्यात आले. मृतदेह पाण्यावर तरंगू नये म्हणून दोरीने तो दगडाला बांधण्यात आला व पाण्यात टाकून देण्यात आला होता.

काल रविवारी सायंकाळच्या सुमारास करमळी येथील मानशीमधील ओहोटीमुळे पाणी कमी झाल्यावर अज्ञात मृतदेह त्याचे हातपाय दोरीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. हा मृतदेह पाण्यावर तरंगू नये म्हणून हातपाय बांधलेली दोरी एका दगडाला बांधण्यात आली होती.

दगड पाण्यात रुतल्याने हातपाय बांधलेला मृतदेह तेथेच पाण्यात तरंगत होता. या घटनेची माहिती मिळताच जुने गोवे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याचा पंचनामा केला.

मृतदेहाच्या हातावर टॅटू होते. याव्यतिरिक्त काहीच माहिती मिळाली नसल्याने पोलिसांनी तो शव चिकित्सेसाठी गोमेकॉ इस्पितळाच्या शवागारात पाठवला.

Old Goa Police Arrested Acused
Goa Politician Scandal: सेक्स स्कँडल भोवणार; मंत्रीपद जाणार की राहणार?

गेल्या काही दिवसांत बेपत्ता असल्याच्या तक्रारीची माहिती जुने गोवे पोलिसांनी बिनतारी संदेशाद्वारे मिळवली. या माहितीद्वारे एका तक्रारीतील माहिती या मृतदेहाच्या वर्णनाशी मिळतीजुळती असल्याने तक्रारदाराशी संपर्क साधला.

त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली. हा खुनाचा प्रकार असल्याचा गुन्हा नोंद करून पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. आज संध्याकाळपर्यंत चार - पाच संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असता खुनाचा उलगडा झाला, अशी माहिती जुने गोवे पोलिसांनी दिली.

आईवडिलांच्या मारहाणीचा बदला

उत्तरप्रदेशमध्ये चंद्ररिका याने संशयितांच्या आईवडिलांना मारहाण केल्याची तक्रार तेथील मिर्झापूर पोलिस स्थानकात दाखल करण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणावरून त्यांच्यातील संबंध अधिक दुरावले होते.

गेल्या आठवड्यात राजेंद्र प्रसाद व रणजीत प्रसाद या दोघांनी ताळगाव येथे रहात असलेल्या चंद्ररिका ऊर्फ गब्बर याला एसबीआय कॉलनी पर्वरी येथे बोलावून घेतले व चंद्ररिका याला बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com