Old Goa : जुने गोवेत लाखोंच्या संख्येने पर्यटक

Old Goa : जुने गोवे येथेदेखील पर्यटकांनी आपली वाहने मुख्य रस्त्याच्या बाजूला पार्क केल्याने वाहतूकदारांना थोडा त्रास झाला.
Old Goa tourist
Old Goa touristDainik Gomantak
Published on
Updated on

Old Goa : तिसवाडी, राज्यात सोमवारी (ता.२५) मोठ्या उत्साहात ख्रिसमस साजरा करण्यात आला. त्यात ख्रिसमसचा मोठा विकेंड आल्याने लाखोंच्या संख्येने पर्यटकांचे आगमन झाले आहे. सोमवारी ख्रिसमसच्या दिवशी जुने गोवेत पर्यटकांनी गर्दी केली होती.

शनिवार, रविवार आणि सोमवार असा विकेंड आल्याने पर्यटक गोव्यात आले होते. त्यात खासकरून महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथील पर्यटक आपली खासगी वाहने घेऊन आल्याने राज्यात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले.

जुने गोवे येथेदेखील पर्यटकांनी आपली वाहने मुख्य रस्त्याच्या बाजूला पार्क केल्याने वाहतूकदारांना थोडा त्रास झाला. जुने गोवे हे जागतिक वारसा असलेले पर्यटन स्थळ असल्याने देशी व विदेशी पर्यटक येथे येतात. पर्यटक येथील स्थळांना भेट देवून आपल्या मोबाईलमध्ये क्षणचित्रे टिपत आहेत.

Old Goa tourist
Goa News Updates 25 December: जाणून घ्या गोव्यातील दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी...

वाहनांची गर्दी

विकेंडची सुट्टी संपल्यानंतर पर्यटकांनी आपल्या राज्याकडे वाटचाल केली. बहुतांश पर्यटक आपली खासगी वाहन घेऊन आले होते.

त्यामुळे येथे मोठ्या संख्येने इतर राज्यांतील वाहने दिसत होती. वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याने वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहतूक पोलिस रस्त्यांवर तैनात करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com