Interschool Cricket Competition: शालेय क्रिकेट स्‍पर्धेत न्‍यू एज्‍युकेशन हायस्‍कूल अजिंक्‍य

Under 14 Interschool Cricket Competition: 14 वर्षीय आंतरशालेय स्‍पर्धेचे विजेतेपद : अंतिम सामन्‍यात सारस्‍वतवर विजय
Under 14 Interschool Cricket Competition
Under 14 Interschool Cricket CompetitionDainik Gomantak

Under 14 Interschool Cricket Competition

क्रीडा व युवा व्‍यवहार खात्‍याने आयोजित केलेल्‍या १४ वर्षाखालील मुलांच्‍या आंतरशालेय क्रिकेट स्‍पर्धेचे राज्‍यस्‍तरीय विजेतेपद कुडचडे येथील काकोडकर्स न्‍यू एज्‍युकेशनल इन्‍स्‍टीट्यूटने मिळविले. आज झालेल्‍या अंतिम सामन्‍यात त्‍यांनी म्‍हापशेच्‍या सारस्‍वत हायस्‍कूलवर ८ गडी राखून विजय मिळविला.

साखळी पालिका मैदानावर हा अंतिम सामना झाला. नाणेफेक जिंकून न्‍यू एज्‍युकेशनल हायस्‍कूलने गोलंदाजी स्‍वीकारली आणि १९.४ षटकांत सारस्‍वतचा डाव ७४ धावात गुंडाळला. सारस्‍वतच्‍या वेदांतने २४ तर कृष्‍णराजने १७ धावा केल्‍या.

न्‍यू एज्‍युकेशनच्‍या शौर्य फडते यांनी गाेलंदाजीत चमकदार कामगिरी करताना ४ षटकात केवळ ९ धावा देऊन ५ बळी घेतले. तर त्‍याला साईकेश नाईक याने ६ धावात एक बळी घेऊन चांगली साथ दिली. या कामगिरीमुळे शौर्य फडते याला मॅन ऑफ द फायनल पुरस्‍कार प्राप्‍त झाला.

सारस्‍वतच्‍या धावांना उत्तर देताना न्‍यू एज्‍युकेशनल इन्‍स्‍टिट्यूटने दोन गड्यांच्‍या मोबदल्‍यात ७५ धावा केल्‍या. त्‍यांच्‍या उज्‍जैर शेख याने नाबाद ३७ तर क्रितेश चंदगडकर याने नाबाद १४ धावा केल्‍या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com