Borim News: तीन वर्षात बोरी पूल उभा राहिल! मैदानाचीही मागणी पूर्ण करू; मंत्री शिरोडकरांचे आश्वासन

Minister Subhash Shirodkar: केंद्राकडून मिळणाऱ्या ४०० कोटींचा निधी खर्चून येत्या तीन वर्षांत नवीन पूल तयार होऊन नागरिकांना उपलब्ध होणार आहे. बोरी येथे मैदानाची आवश्यकता असून तीही मागणी लवकरच पूर्ण करण्यात येईल,असे जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.

Borim Stadium Canva
Published on
Updated on

शिरोडा: बोरी येथे उभारण्यात येणाऱ्या नव्या प्रकल्पाची प्रक्रिया पूर्ण झाली असून केंद्र सरकारकडून मान्यता मिळाल्याने यासाठी लागणारी जागाही संपादित केली आहे. केंद्राकडून मिळणाऱ्या ४०० कोटींचा निधी खर्चून येत्या तीन वर्षांत नवीन पूल तयार होऊन नागरिकांना उपलब्ध होणार आहे. बोरी येथे मैदानाची आवश्यकता असून तीही मागणी लवकरच पूर्ण करण्यात येईल,असे जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.

शिरोडा मतदार संघातील सहा विकलांगांना भारत सी एस आर नेटवर्क यांच्यातर्फे सहा जणांना ई बाईक वितरण करण्यात आल्या. त्यावेळी मंत्री शिरोडकर बोलत होते.

गोव्यातील काही पंचायतीमधील आठ पंचायतींना क्लीन व ग्रीन गोवा पुरस्कार लाभलेला आहे .त्यापैकी शिरोडा पंचायतीचा समावेश असून शिरोडा पंचायतीला क्लीन व ग्रीन गोवा पुरस्कार लाभलेला आहे तो केवळ नागरिकांमुळे.

Minister Subhash Shirodkar:  केंद्राकडून मिळणाऱ्या ४०० कोटींचा निधी खर्चून  येत्या तीन वर्षांत नवीन पूल तयार होऊन नागरिकांना उपलब्ध होणार आहे. बोरी येथे मैदानाची आवश्यकता असून तीही मागणी लवकरच पूर्ण करण्यात येईल,असे जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.
Goa Police: उत्तर गोव्यात पोलिस 'ऍक्शन मोडवर'! 122 समाजकंटकांविरोधात कारवाई

यापुढेही नागरिकांनी असेच सहकार्य करून आपला शिरोडा स्वच्छ ठेवण्यात हातभार लावावा, असे आवाहन सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले.शिरोडा येथील श्री गणेशोत्सव मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मंत्री सुभाष शिरोडकर बोलत होते.

यावेळी भारत सीएसआर नेटवर्कचे साजिद सय्यद, जिल्हा अधिकारी चंद्रकांत शेटकर, बोरी पंचायतीचे सरपंच जयेश नाईक, पंचवाडी पंचायतीच्या सरपंच लीना फर्नांडिस, शिरोडा पंचायतीच्या सरपंच पल्लवी शिरोडकर, बेतोडाचे सरपंच मधु खांडेपारकर तसेच डॉ.गौरी शिरोडकर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com