Goa News : ‘रवींद्र केळेकर जीवन आणि योगदान’वर राष्ट्रीय परिसंवाद ; १ ऑगस्ट रोजी मडगावात आयोजन

Goa News : हा राष्ट्रीय परिसंवाद कोकणी विभाग, शासकीय कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, केपे यांच्या पुढाकाराने, साहित्य अकादमी, गोवा कोकणी अकादमी आणि रवींद्र भवन मडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने १ ऑगस्ट रोजी परिषद सभागृह, रवींद्र भवन-मडगाव येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
Goa
GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी, गांधीवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक, आधुनिक कोकणी चळवळीचे प्रणेते, भाषाशास्त्रज्ञ आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते सुप्रसिद्घ साहित्यिक रवींद्र केळेकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘रवींद्र केळेकर जीवन आणि योगदान’ याविषयावर राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

हा राष्ट्रीय परिसंवाद कोकणी विभाग, शासकीय कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, केपे यांच्या पुढाकाराने, साहित्य अकादमी, गोवा कोकणी अकादमी आणि रवींद्र भवन मडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने १ ऑगस्ट रोजी परिषद सभागृह, रवींद्र भवन-मडगाव येथे आयोजित करण्यात आलेला आहे.

Goa
Goa News: गोव्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता, मोरजीत दोन होड्या जळून खाक; गोव्यातील ठळक बातम्या

१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वा. होणाऱ्या या चर्चासत्राचे उद्‌घाटक केपे सरकारी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. जयदीप भट्टाचार्य हे आहेत.

तर प्राचार्य भूषण भावे बीजभाषण करतील. प्रमुख पाहुणे गोवा कोकणी अकादमीचे सचिव दामोदर मोरजकर, गिरीश रवींद्र केळेकर, तर उद्‌घाटन सत्राचे अध्यक्षस्थान गोवा कोकणी अकादमीचे प्रभारी अध्यक्ष वसंत सावंत हे भूषवतील.

रवींद्र केळेकर यांच्या साहित्यातील तत्त्वे, मूल्ये

 सकाळी ११.४५ वाजता सुरू होणाऱ्या पहिल्या सत्राचे अध्यक्षस्थान प्राचार्य

डॉ. राजय पवार हे भूषवणार आहेत. ‘रवींद्र केळेकर यांच्या साहित्यातील तत्त्वे आणि मूल्ये’ याविषयांतर्गत अनंत अग्नी (रवींद्र केळेकर यांच्या साहित्यातले तत्त्वज्ञान), नारायण देसाई (रवींद्र केळेकर यांच्या साहित्यातील सौंदर्यतत्त्व), राजू नायक (रवींद्र केळेकर यांच्या साहित्यातील निसर्ग आणि पर्यावरण) आदी मान्यवर तज्ज्ञ शोधनिबंध सादर करतील.

Goa
Goa News : २८ वर्षांनंतर गोमंतकीय खेळाडू ऑलिंपिक मैदानावर

रवींद्र केळेकर यांच्या साहित्यातला देश, प्रदेश, विश्व

दुपारी २.३० वाजता सुरू होणाऱ्या दुसऱ्या सत्राचे अध्यक्षस्थान डॉ. पूर्णानंद च्यारी हे भूषवतील. ‘रवींद्र केळेकर यांच्या साहित्यातला देश, प्रदेश आणि विश्व’ याविषयांतर्गत डॉ. प्रकाश वझरीकर (रवींद्र केळेकर यांच्या साहित्यातील भारतीयता), डॉ. हनुमंत चोपडेकर (कोकणी भाषिक चळवळीचे दिशादर्शक : रवींद्र केळेकर), पय्यन्नूर रमेश पै (रवींद्र केळेकर यांच्या साहित्यातील वैश्विकता) आदी मान्यवर तज्ज्ञ शोधनिबंध सादर करतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com