Goa: गोव्यातील राष्ट्रीय सीमाशुल्क आणि GST संग्रहालयात बॉम्ब ठेवलाय! धमकीचा ईमेल आणि पोलिसांची धावपळ

ईमेल फसवा असल्याची खात्री केल्यानंतरच दुपारी संग्रहालय खुले करण्यात आले.
National Museum of Customs and GST
National Museum of Customs and GSTDainik Gomantak

National Museum of Customs and GST: गोव्यातील राष्ट्रीय सीमाशुल्क आणि GST संग्रहालयात बॉम्ब ठेवला असून, परिसर उडवून देणाऱ्या धमकीचा ईमेल संग्रहलयाला प्राप्त झाला. शुक्रवारी सकाळी हा धमकीचा ईमेल प्राप्त झाल्यानंतर गोवा पोलिसांच्या बॉम्ब निकामी पथकाने परिसराचा शोध घेतला.

ईमेल फसवा असल्याची खात्री केल्यानंतरच दुपारी संग्रहालय खुले करण्यात आले.

धरोहर असे नाव देण्यात आलेल्या राष्ट्रीय सीमाशुल्क आणि GST संग्रहालयाच्या आवारात स्फोटके पेरण्यात आली आहेत. असा ईमेल शुक्रवारी सकाळी संग्रहालयाला प्राप्त झाला.

ईमेल प्राप्त झाल्यानंतर आम्ही ताबडतोब पणजी पोलीस ठाण्यात धाव घेऊन माहिती दिली. त्यानंतर बॉम्ब निकामी पथकाला पाचारण करण्यात आले आणि संग्रहालयात संशयास्पद वस्तूंची तपासणी करण्यात आली," असे संग्रहालय अधिकाऱ्यांनी सांगितले.

पोलिसांनी ईमेल फसवा असल्याची खात्री केल्यानंतर दुपारी संग्रहालय खुले करण्यात आले, असेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जून 2022 मध्ये धरोहर: राष्ट्रीय सीमाशुल्क आणि GST संग्रहालयाचे उद्घाटन केले होते.

पोर्तुगीज राजवटीत अल्फाडेंगा म्हणून ओळखल्या जाणारी दोन मजली ही इमारत मांडवी नदीच्या काठावर स्थित आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com