Narcotic Raid: अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी 27 वर्षीय युवकाला अटक; 1.40 लाखांचा मुद्देमाल जप्त

अमली पदार्थांच्या तस्करीची माहिती मिळताच कोलवाळ पोलिसांनी सापळा रचत एकाला अटक केले आहे.
Narcotic Raid by Colvale Police
Narcotic Raid by Colvale Police Dainik Gomantak

Narcotic Raid by Colvale Police

अमली पदार्थांच्या तस्करीची माहिती मिळताच कोलवाळ पोलिसांनी सापळा रचत एकाला अटक केले आहे. ही कारवाई काल रात्री करण्यात आली. कोलवाळ पोलिस स्टेशनचे पीआय विजय राणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापा टाकून आरोपी सुरल सुखानंद फडते (वय 27, कोलवाळ) याला अटक केली आहे.

Narcotic Raid by Colvale Police
वाहन परवान्यासाठी प्रणाली कडक हवी; DGP Jaspal Singh

आरोपीकडून 1,40,000 किमतीचे 12 ग्रॅम एमडीएमए 200 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. त्याला NDPS कायदा 1985 च्या कलम 22(c) आणि 20(b) (i(A) अन्वये ताब्यात घेतण्यात आले असून आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे.

एसडीपीओ म्हापसा जीवबा दळवी यांच्या संपूर्ण देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली. दरम्यान संबंधित घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com