Bicholim News : नानोड्यात सहलीसाठी गेलेले दोघेजण बुडाले

Bicholim News : पहिल्‍या घटनेत पणजीतून एक तिघांचा गट नानोडा परिसरात सहलीसाठी गेला होता. उकाड्याने हैराण झालेले हे युवक दुपारी सव्वाएकच्या सुमारास आंघोळीसाठी तेथीलच श्री विठ्ठल मंदिराजवळील एका चिरेखाणीत उतरले.
Bicholim
BicholimDainik Gomantak

Bicholim News :

डिचोली, नानोडा परिसरात आज रविवारी घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्‍ये दोन सतरा वर्षीय मुलांना जलसमाधी मिळाली. मोहित कश्यप (सांतिनेज-पणजी) व दीप बागकर (दाडाचीवाडी-धारगळ) अशी मृतांची नावे आहेत. दरम्‍यान, दोन्ही घटनांमध्‍ये मिळून पाच जणांना वाचविण्‍यात यश आले.

पहिल्‍या घटनेत पणजीतून एक तिघांचा गट नानोडा परिसरात सहलीसाठी गेला होता. उकाड्याने हैराण झालेले हे युवक दुपारी सव्वाएकच्या सुमारास आंघोळीसाठी तेथीलच श्री विठ्ठल मंदिराजवळील एका चिरेखाणीत उतरले. त्‍यातील मोहित कश्यप हा बुडू लागताच अन्य दोघांनी आरडाओरड सुरू केली.

माहिती मिळताच डिचोली अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत बुडून मृत्‍यू पावलेल्‍या मोहितचा मृतदेह स्थानिकांनी पाण्याबाहेर काढला होता. तर, पाण्यात गटांगळ्या खाणाऱ्या अन्य दोन युवकांना दलाने सुखरूप बाहेर काढले. हे तिघेही मद्यप्राशन करून पाण्‍यात उतरले होते.

Bicholim
Stray Dogs On Goa Beach: बॉलिवूडची अभिनेत्री, रशियन महिलेला बीचवर भटक्या कुत्र्याने घेतला चावा, पर्यटक दहशतीखाली

दुसरी घटना संध्‍याकाळी चारच्‍या सुमारास तेथूनच जवळ असलेल्‍या नानोडा येथील कालव्‍यात घडली. तेथेही तिघांचा गट सहलीसाठी गेला होता. हे तिघेही आंघोळीसाठी कालव्‍यात उतरले. परंतु त्‍यातील दीप बागकर हा पाण्‍यात गंटागळ्‍या खाऊन बुडाला. अग्निशामक दलाच्या जवानांनी शोध घेतला पण रात्री उशिरापर्यंत त्‍याचा थांगपत्ता लागला नाही.

नानोडा परिसरात एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या घटनांमध्‍ये दोन १७ वर्षीय मुलांचा बुडून मृत्यू होणे या घटना दुर्दैवी आहेत. चिरेखाणी वा कालव्यासारख्या धोकादायक जलस्रोतांनी आंघोळ करण्याचा कोणीही धोका पत्करू नये. पोलिसांनी अशा ठिकाणी गस्त ठेवावी. दोन्‍ही कुटुंबांच्‍या दु:खात मी सहभागी आहे.

- डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार (डिचोली)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com