Nana Patekar: आता गोव्यातही "नाम" फाऊंडेशनची मुहुर्तमेढ रोवणार; नाना पाटेकरांची घोषणा

NAAM Foundation: गोव्यातही लवकरच 'नाम' फाऊंडेशन सुरु करणार असल्याची घोषणा अभिनेते नाना पाटेकर यांनी केली आहे. नाना सध्या गोव्याच्या दौऱ्यावर आहेत.
Nana Patekar: आता गोव्यातही "नाम" फाऊंडेशनची मुहुर्तमेढ रोवणार; नाना पाटेकरांची घोषणा
Nana PatekarDainik Gomantak
Published on
Updated on

आपल्या अभिनयाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे मराठी अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी ‘नाम फाउंडेशन’ची स्थापना केली. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी 'नाम' ची मुहुर्तमेढ रोवण्यात आली. यातच आता, गोव्यातही लवकरच 'नाम' फाऊंडेशन सुरु करणार असल्याची घोषणा अभिनेते नाना पाटेकर यांनी केली आहे. नाना सध्या गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. गोवा विद्यापीठात नाना यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. नाना यांनी विविध विषयांवर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी संवाद साधला.

नाना म्हणाले की, 'गोव्यातही लवकरच "नाम" फाऊंडेशन सुरु करण्यात येईल. गोव्यातील शेतकऱ्यांना प्राधान्य देत जलसंवर्धनाचे काम सुरु करण्याचा आमचा मानस आहे.'

Nana Patekar: आता गोव्यातही "नाम" फाऊंडेशनची मुहुर्तमेढ रोवणार; नाना पाटेकरांची घोषणा
Goa Navratri 2024: छत्रपती शिवाजी महाराजांचे गोव्यात आगमन होण्यापूर्वीचे देवीचे मंदिर कोणते माहितीये?

दुष्काळग्रस्तांच्या वेदना, दु:ख आणि दारुण परिस्थिती मी पाहून आलो आहे. कितीही केले तरी कमी पडावे, इतके त्यांचे दु:ख मोठे आहे. त्यामुळे वैयक्तिक पातळीवर जे करणे शक्य होते, ते केलेच, पण त्यापलीकडे अधिक व्यापक स्तरावर काय करता येईल, याचा विचार ‘नाम फाउंडेशन’पर्यंत आम्हाला घेऊन आला’, असे नाना यांनी यापूर्वी म्हटले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com