Mormugao नगरपालिका तिजोरीत खडखडाट; वसुली मोहिमला आला वेग

पालिका तिजोरीत खडखडाट; कर्मचाऱ्यांचा पगारही लांबणीवर
Mormugao
MormugaoDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: मुरगाव नगरपालिकेने बुधवारी वास्को शहरातील दुकानदार व इतर व्यापारी आस्थापनांचे व्यापारी परवाने तपासण्याची मोहीम हाती घेतली. पालिकेकडून थकबाकी वसूल झाली नसल्याने कर्माचाऱ्यांचा पगारासाठी ही तारेवरची कसरत करावी लागत असल्याची स्थिती सध्या नगरपालिकेने परवाने तपासणी मोहिम वेगाने सुरु केली आहे.

(Murgaon Municipality checked the licenses of the traders in Vasco)

Mormugao
Goa Mega Job Fair: गोव्यात 8 नोव्हेंबर रोजी मेगा जॉब फेयरचे आयोजन

राज्यात 'अ' दर्जाची पालिका म्हणून मुरगाव पालिकेचे नामांकन आहे. मात्र थकबाकी वसुली कारणास्तव पालिका सध्या बॅकफूटवर आहे. पालिका तिजोरीत खडखडाट निर्माण झाल्याने पालिकेला कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासही कित्येक वेळा तारेवरची कसरत करावी लागते. याव्यतिरिक्त अनेक समस्यांच्या गर्तेत मुरगाव पालिका सापडली आहे.

Mormugao
Mopa Airport: मोपा नामकरण बाबतीत आमदारांचे मौन आश्‍चर्यकारक!

दरम्यान पालिका तिजोरी झालेला खडखडाट व लोकांच्या तक्रारीला अनुसरून मुरगाव पालिकेचे नगराध्यक्ष लिओ रॉड्रिक्स, मुख्याधिकारी जयंत तारी यांनी आज स्वतः व्यापार परवान्याची पडताळणी करण्यासाठी शहरातील दुकाने आस्थापनांना भेट देऊन व्यापार परवान्याची पडताळणी करण्यासाठी उतरावे लागले आहे.

नगराध्यक्ष मुख्याधिकाऱ्यांनी दुकानांना दिलेल्या भेटीदरम्यान अनेक दुकानदारांनी थकबाकी दिली नसल्याचे आढळून आले. त्या दुकानदारांना लवकरात लवकर थकबाकी पालिकेत भरण्याचे फर्मान सोडण्यात आले. तसेच काहींनी ट्रेड लायसन्सचे नूतनीकरण केले नसल्याचे आढळून आले. त्यांनाही ताकीद देण्यात आली. या मोहिमेमुळे मुरगाव पालिकेला महसूल गोळा करण्यास मदत होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com