Vasco News : मुरगाव वारकरी संस्थान कार्यालयाचे उद्‍घाटन

Vasco News : मुरगाव वारकरी संस्थान मुरगावतर्फे आषाढी एकादशी निमित्त पहिली पंढरपूर पायी वारी २ जुलै रोजी संभाजीनगरहून पंढरपूरला निघणार आहे.
Vasco
Vasco Dainik Gomantak

Vasco News :

वास्को, मुरगाव वारकरी संस्थानतर्फे आयोजित आषाढी एकादशीनिमित्त पहिल्या पंढरपूर वारीसाठी प्रवेशिकांचे वितरण तसेच संस्थानच्या कार्यालयाचे उद्‍घाटन पांडववाडी मुरगाव येथे श्री ब्राह्मणेश्वर मंदिरात आमदार संकल्प आमोणकर यांच्या हस्ते करण्यात आले.

मुरगाव वारकरी संस्थान मुरगावतर्फे आषाढी एकादशी निमित्त पहिली पंढरपूर पायी वारी २ जुलै रोजी संभाजीनगरहून पंढरपूरला निघणार आहे. त्यानिमित्त आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सकाळी श्री ब्राह्मणेश्वर मंदिर, सडा शिवशंभू मार्ग मुरगाव येथे प्रवेशिकांचे वितरण आमदार संकल्प आमोणकर यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी संस्थानच्या कार्यालयाचे उद्‍घाटनही करण्यात आले. यावेळी मुरगाव वारकरी संस्थानचे अध्यक्ष रामकृष्ण होन्नावरकर, दिलीप म्हावळणकर, लक्ष्मीदास सातार्डेकर, शिवा गवस, सुहासिनी तांडेल,माजी उपनगराध्यक्ष कृष्णा तोरसकर, सुशांत नाईक, उमाजी केळूस्कर, संतोष म्हावळणकर व इतर सदस्य उपस्थित होते.

Vasco
Ayodhya Ram Temple Pran Pratishtha: रुद्रेश्वर मंदिरातून निघाली रॅली...Dr Pramod Sawant |Gomantak Tv

सदर वारीचे संभाजीनगर येथून २ जुलै रोजी प्रस्थान होणार असून पंढरपूरला ही वारी १३ दिवसांनी पोहोचणार आहे. त्यानंतर ही वारी १७ जुलै रोजी विठूरायाचे दर्शन घेऊन १८ जुलै रोजी परतीच्या मार्गावर मार्गक्रमण करणार आहे. संपूर्ण वारीचे दिंडी प्रमुख रामकृष्ण होन्नावरकर हे असतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com