Morjim News : बिबट्याने पाडला कुत्र्याचा फडशा; तुयेत भीतीचे वातावरण  

Morjim News : मात्र, श्‍वान साखळीने बांधले असल्यामुळे बिबट्याला नेता आले नाही; परंतु बिबट्याने कुत्र्याच्या शरीराचा काही भाग खाऊन पलायन केले.
Leopard
Leopard Dainik Gomantak

Morjim News :

मोरजी, भोमवाडा-तुये येथील चंदन नाईक यांच्या घराबाहेर बांधून ठेवलेल्या पाळीव कुत्र्याचा बिबट्याने फडशा पाडला. या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी वन खात्याकडे केली आहे.

Morjim News :

पेडणे तालुक्यात गावागावांमध्ये बिबट्याचा संचार वाढला असून चारच दिवसांपूर्वी बिबट्याने पाळीव जनावरांवर हल्ले केले होते. तुये येथे २९ रोजी रात्री ११ वाजता चंदन नाईक यांच्या घराच्या गॅलरीमधील पाळीव श्‍वानावर बिबट्याने हल्ला केला.

मात्र, श्‍वान साखळीने बांधले असल्यामुळे बिबट्याला नेता आले नाही; परंतु बिबट्याने कुत्र्याच्या शरीराचा काही भाग खाऊन पलायन केले. दोन महिन्यांपूर्वी तुये येथे एका कुत्र्यावर, तर त्यापूर्वी सोणये-तुये येथे चार कुत्र्यांवर बिबट्याने हल्ला केला होता. हरमल येथे गेल्या आठ दिवसांत दोन बिबट्यांनी तब्बल १५ कोंबड्या फस्त केल्या आहेत.

जंगलांची तोड करून लोकवस्त्या उभारल्या जात असल्याने वन्य प्राणी असुरक्षित बनले आहेत. अन्न- पाण्याच्या शोधात ते लोकवस्तीत येतात. काजूच्या हंगामात लोक जंगलात बोंडू काजू गोळा करण्यासाठी जातात, त्यावेळी वन्य प्राण्यांनी शेतकऱ्यांवर हल्ले केल्याचे प्रकारही घडले आहेत.

Leopard
Goa Smoking Addiction: गोव्यात मुलांपेक्षा मुलींमध्ये धूम्रपानाचे प्रमाण अधिक, ग्रामीण भागात युवक गुटख्याच्या आहारी

रानटी जनावरांचा उच्छाद; शेती-बागायतींचे नुकसान

 पेडणे तालुक्यात दहा-बारा वर्षांपूर्वी चांदेल, हसापूर, इब्रामपूर, हळर्ण, तळर्ण, पत्रादेवी कासारवर्णे, हाळी या भागांत जंगली हत्ती लोकवस्तीत घुसून शेती बागायतीची, फळाफुलांची मोठ्या प्रमाणात नासाडी करत असत.

आता गव्यांनी आपला मोर्चा लोकवस्तीकडे वळविला आहे. शिवाय माकड आणि खेती पूर्णपणे लोकवस्तीत घुसून थैमान घालत असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी केल्या आहेत.

शिवोलीतही बिबट्याचे दर्शन

शिवोली : मार्ना-शिवोली पंचायत क्षेत्रातील घोलान परिसरात बुधवारी मध्यरात्री बिबट्याचे दर्शन घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात सुरक्षा रक्षकाचे काम करणाऱ्या नवजीत दत्ता या तरुणाने बिबट्याला रस्ता ओलांडताना पाहिले आणि तो भीतीने जोरात ओरडला.

तोपर्यंत बिबटा जंगलात पळून गेला होता. घोलान हा भाग जंगलसदृश असून या भागात दोनशेच्या आसपास लोकवस्ती आहे. त्यामुळे या भागात घबराट निर्माण झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com