Morjim: मोरजी किनाऱ्यावर परप्रांतीयांची अरेरावी! पलंग, खुर्च्यांचे अतिक्रमण; पर्यटन खात्याचे दुर्लक्ष

Morjim Beach Encroachment: पर्यटन हंगामाच्या सुरुवातीलाच अतिक्रमणाचा प्रकार सुरू असून याकडे पर्यटन खात्याचे पूर्ण पणे दुर्लक्ष झालेले आहे.
Morjim Beach Encroachment
Morjim Beach EncroachmentDainik Gomantak
Published on
Updated on

Morjim Beach illegal structures

मोरजी: कायदे आणि नियम हे स्थानिक नागरिक व्यावसायिकांना लगेच लागतात. मात्र, बिगर गोमंतकीय व्यावसायिकांना कायद्याचे काहीही पडलेले नाही. आम्हाला पर्यटन व्यवसायाशी संबंधित कोण अडवणार ? , आम्ही कितीही लाकडी पलंग, खुर्च्या घालून किनारी अडवले तरी आम्हाला पर्यटन खात्याचे अधिकारी कसे अडवतील, असा त्यांचा प्रश्न आहे,मोरजी पंचायत क्षेत्रातील विठ्ठलदास वाडा किनारी भागातील बिगर गोमंतकीय व्यावसायिकांचा.

आमचे लाकडी पलंग हटवले तर लगेच तेच आणून देतात, असा दावाही ते करतात. सविस्तर माहितीनुसार विठ्ठलदास वाडा मोरजी किनारी भागात जे खासगी जागेत शॅक्स, रिसॉर्ट, रेस्टॉरंट, क्लब व्यावसायिक आहेत. त्यांनी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात लाकडी पलंग लाकडी खुर्च्या टेबल मांडून किनारे अडवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि या अतिक्रमण झालेल्या किनाऱ्यावर पर्यटन खात्याचे दुर्लक्ष झाल्याचे मत एक पर्यटक नितेश कुमार डांगी यांनी व्यक्त केले.

Morjim Beach Encroachment
Goa Tourism: पर्यटकांनी गोव्याकडे पाठ फिरवली तर ती नागरिकांसाठी आनंदाची बातमी का असते?

विठ्ठलदास वाडा मोरर्जी किनारी भागात दरवर्षी खाजगी जमिनीचे बिगर गोमंतयांची रिसॉर्ट सॅक व्यवसाय आहेत. ते व्यावसायिक किनाऱ्यावर कसल्याच प्रकारचे परवाने न घेता शेकडो संख्येने लाकडी पलंग लाकड्या खुर्च्या टेबल घालून अतिक्रमण केल्याचे चित्र दिसून येते. पर्यटन हंगामाच्या सुरुवातीलाच अतिक्रमणाचा प्रकार सुरू असून याकडे पर्यटन खात्याचे पूर्ण पणे दुर्लक्ष झालेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com