Mopa Airport : ‘मोपा’वर उतरले पहिले मालवाहू विमान

Mopa Airport : जीएमआर’ने पहिल्या टप्प्यात वार्षिक २५००० मेट्रिक टन कार्गो हाताळण्याची क्षमता असलेले एअर कार्गो लॉजिस्टीक टर्मिनल तयार केले आहे.
Mopa Airport
Mopa AirportDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे, मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिले २२ टन मालवाहू विमान २४ जुलै रोजी पहाटे उतरले.

तुर्कीच्या चॅम्पमन फ्री बॉर्न एअर चार्टर्सचे हे मालवाहू विमान उतरले. गोव्यातील हे पहिले व्यावसायिक मालवाहू विमान आहे. अत्याधुनिक कार्गो सुविधांसह ऑफ लोड स्टोरेज व क्लिअरन्सच्या सोयी त्यात आहेत.

या विमानतळावरून आता मालवाहू विमानांचा मार्ग सुकर झाला आहे. हा विमानतळ आता देशातील कार्गो हब म्हणून नावारूपास येईल. एअर इंडिया, ओमान एअर, इंडिगो, आकासा, विस्तारा व स्पाइज जेटद्वारे ५००० देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय हवाई कार्गो हाताळते.

Mopa Airport
Russia Ukraine War: झेलेन्स्कींची मोठी घोषणा, युक्रेनला मिळणार 42 F-16 लढाऊ विमाने, आता...

जीएमआर’ने पहिल्या टप्प्यात वार्षिक २५००० मेट्रिक टन कार्गो हाताळण्याची क्षमता असलेले एअर कार्गो लॉजिस्टीक टर्मिनल तयार केले आहे. त्यासाठी पूर्ण वाढीव मालवाहू पायाभूत सुविधा व कुशल मनुष्यबळासह गोव्यात नवीन कार्गोसाठी विमानतळ उपलब्ध झालेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com