Monsoon Materials : पावसाळी साहित्याने वाळपईचा बाजार फुलला; खरेदीला जोर

Monsoon Materials : आस्थापनांची संख्या वाढलेली आहे. मे महिना संपत आला की लोक पावसाळी साहित्य खरेदीकडे वळतात.
Monsoon Materials
Monsoon MaterialsDainik Gomantak

Monsoon Materials :

वाळपई, गेले दहा बारा दिवस राज्यात अवकाळी पावसाचा जोर सुरू आहे. त्यामुळे बाजारात पावसाळी साहित्य विक्रीला तेजी आली आहे. वाळपईच्या बाजारात विविध आस्थापनांत छत्र्या, रेनकोट, शालेय पुस्तके, वह्या आदी साहित्य दाखल झाले आहे.

वाळपई ही सत्तरी तालुक्याची मुख्य बाजारपेठ आहे. पोर्तुगीज काळापासून येथे बाजार भरतो. सध्या या बाजाराचा चेहरा बदललेला आहे. आस्थापनांची संख्या वाढलेली आहे. मे महिना संपत आला की लोक पावसाळी साहित्य खरेदीकडे वळतात.

सध्या दररोज सायंकाळच्या वेळेत मुसळधार पाऊस कोसळतो, त्यामुळे बाजारात रेनकोट, छत्र्यांना मागणी वाढली आहे. अनेक आस्थापनांत पावसाळी साहित्य खरेदीसाठी गर्दी दिसते. पुढील काही दिवसांत ही गर्दी आणखी वाढणार आहे.

Monsoon Materials
Flights To Goa: छत्रपती संभाजीनगर ते गोवा थेट विमानसेवेची घोषणा, जूनपासून आठवड्याला तीन फ्लाईट्स

काही दिवस पडत असलेल्या पावसामुळे पावसाळी साहित्य खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आपल्या आस्थापनांत ग्राहकांना मनपसंदीचे पावसाळी साहित्य विक्रीसाठी उपलब्ध केले आहे. छत्र्या, रेनकोटला मागणी जास्त आहे. तसेच वह्या, पेन, पुस्तकेही उपलब्ध आहेत.

- रुद्रेश मणेरकर, व्यावसायिक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com