Extortion Case: खंडणी प्रकरणी मंत्री सुभाष फळदेसाई यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करणार; मिथिल फळदेसाई

Minister Subhash PhalDesai: मिथिल फळदेसाई हा मंत्री सुभाष फळदेसाई यांच्याविरोधात न्यायालयात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे अखिल फळदेसाई यांनी पत्रकारांना सांगितले.
Mithil PhalDesai will file a defamation case against minister Subhash PhalDesai in the extortion case
Mithil PhalDesai will file a defamation case against minister Subhash PhalDesai in the extortion caseDainik Gomantak

Extortion Case: खंडणी प्रकरणात गुन्हा नोंद झालेला संशयित मिथिल देसाई याचा भाऊ अखिल फळदेसाई आणि त्याच्या आईने मंगळवारी पणजीत पत्रकार परिषद घेऊन आपल्या मुलावर केले जाणारे आरोप खोटे असून हा राजकीय सूड उगवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. असे खोटे आरोप करून बदनामी केल्यामुळे मिथिल फळदेसाई हा मंत्री सुभाष फळदेसाई यांच्याविरोधात न्यायालयात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे अखिल फळदेसाई यांनी पत्रकारांना सांगितले.

काही दिवसांपूर्वी मिथिल देसाई या युवकाविरुद्ध समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागात तक्रार नोंदवल्यानंतर त्याला अटक केली होती. या प्रकरणात पोलिसांनी (Police) काही लोकांना चौकशीसाठी बोलावले होते. हा सगळा प्रकार सुरू असताना आता मिथिल देसाई याचा कनिष्ठ भाऊ आणि त्याच्या आईने पणजीत पत्रकार परिषद घेत या विषयावर काही खुलासे केले.

Mithil PhalDesai will file a defamation case against minister Subhash PhalDesai in the extortion case
Vasco Extortion Case: खंडणीसाठी वास्कोच्या व्यावसायिकाचे अपहरण करणाऱ्या आरोपीला जन्मठेप

आईने सांगितले की, मिथिल आणि फळदेसाई हे दूरचे नातेवाईक आहेत. दोन दिवसांपूर्वी काहीजणांनी केपेत पत्रकार परिषद घेऊन मिथिलवर जे आरोप केले, ते साफ खोटे आहेत. पत्रकार परिषद घेणारे मंत्री फळदेसाई यांचे नातेवाईक होते आणि त्यांनी मिथिलवर खोटे आरोप केल्याचे मिथिलच्या आई म्हणाल्या.

Mithil PhalDesai will file a defamation case against minister Subhash PhalDesai in the extortion case
Vasco Extortion Case: आणखी दोघांना अटक, दोन पोलिसही निलंबित; वास्कोतील खंडणी प्रकरणाला नवे वळण

दरम्यान, मिथिलचा धाकटा भाऊ अखिल फळदेसाई यांनी सांगितले की, माझ्या मोठ्या भावावर मंत्री फळदेसाई यांनी जे आरोप केले आहेत, त्यात काहीच तथ्य नाही. याविरुद्ध मिथिल न्यायालयात (Court) मंत्री फळदेसाई यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल करणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com