पुण्यातील 'तो' बेपत्ता युवक अखेर सापडला गोव्यात! खडक पोलिसांनी दिली माहिती

18 ऑगस्टपासून 21 वर्षांचा युवक महाराष्ट्रातील पुण्यातून बेपत्ता
Missing Youth From Pune Found in Goa
Missing Youth From Pune Found in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Missing Youth From Pune Found in Goa

18 ऑगस्टपासून 21 वर्षांचा युवक महाराष्ट्रातील पुण्यातून बेपत्ता झाला होता. तो गोव्यात असल्याची माहिती पुण्यातील खडक पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी राज्यातील पोलिसांना संपर्क साधून बेपत्ता युवकबद्दल माहिती दिली.

Missing Youth From Pune Found in Goa
Janta Darbar: वास्‍कोतील जनता दरबारात मंत्री सुदिन ढवळीकर निरुत्तर

सतीश यादव (21, पुणे) असे त्या युवकाचे नाव असून तो 18 ऑगस्टपासून तो बेपत्ता होता. माहितीनुसार, तो मानसिक तणावात असल्यामुळे त्याने घर सोडले होते. याबाबत त्याच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली.

बरेच दिवस तो घरी परतलाच नसल्याने शोधमोहिम आणखी तीव्र करण्यात आली. त्यानंतर तो गोव्यात असल्याची माहिती खडक पोलिसांना मिळाली. तो ओल्ड गोव्यात असल्याचे कळताच पोलिसांनी इथल्या पोलिसांशी संपर्क साधला.

ओल्ड गोवा पोलिसांनी माहिती मिळताच, सतीशला ताब्यात घेतले. यानंतर खडक पोलीस आणि सतीशचे नातेवाईक ओल्ड गोव्यात त्याला नेण्यासाठी येत असल्याची माहिती आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com